रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) येथे आज दिनांक ९ जुलै शुक्रवार रोजी ४.३० ते ०५ : ०० वाजेचे दरम्यान रावेर पोस्टेला रावेर शहरातील सराफ दुकानदार याची बैठक ही मा. Dysp श्री. नरेंद्र पिंगळे सो. फैजपूर भाग फैजपूर यांचे नेतृत्वात घेण्यात आली. त्यांना cctv कॅमेरे लावण्याबाबत तसेच बंद कॅमेरे चालू करून घेणेबाबत तसेंच सायरण, अलार्म सिस्टीम लावण्याबाबत तसेच रात्री व दिवसाच्या वेळी सुरक्षा रक्षक नेमवा अशा योग्य त्या सूचना देवून योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले आहे.
[ads id='ads1]
सदर मीटिंगला पोलीस निरीक्षक श्री.रामदास बी. वाकोडे, सहा. पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक, पो. उप निरीक्षक अनिस शेख, पो उप निरीक्षक मनोज वाघमारे, पो. उप. निरीक्षक मनोहर जाधव, तसेच विजय वसंत गोटीवाले अध्यक्ष सराफा असोसिएशन रावेर,शशांक शरदराव बोरकर, संजय वसंत बोरकर,अनिश अग्रवाल,राजेश शामलला अग्रवाल, विक्रम सुरेश बोरकर, मनोज काशिनाथ विचूरकर यांचेसह 15 सराफा दुकानदार बैठकीला उपस्थित होते.
