एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशन तर्फे पत्रकार सुभाषचंद्र वाघोलीकर यांना श्रद्धांजली

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  औरंगाबाद (प्रतिनिधी)ज्येष्ठ पत्रकार सुभाषचंद्र वाघोलीकर यांना सी एम बीसी  एन सेवन सिडको येथे एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशन तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार स.सो.खंडाळकर आणि ज्ञानेश्वर खंदारे यांनी वाघोलीकर यांच्या पत्रकारितेतील कारकीर्दीवर प्रकाश टाकला आणि अनेक आठवणींना उजाळा दिला. 

  प्रारंभी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतनकुमार साळवे  यांनी प्रास्ताविक केले. सुभाष चन्द्र वाघोलीकर यांचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम नव्या पिढीला संदेश देणारा आहे. वाघोलीकर नाशिकचे असले तरी औरंगाबाद मध्येचे ते जास्त रूळले होते.त्यांची पत्रकारिता निर्भीड होती.असे साळवे यांनी यावेळी नमूद केले. ज्येष्ठ पत्रकार स. सो.खंडाळकर यांनी वाघोलीकर यांच्या अभ्यासपूर्ण व समर्पित पत्रकारितेचा गौरव केला. त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व होते.  ते समाजवादी विचारसरणीचे पत्रकार होते. निवृत्त झाल्यानंतर प्रभावी लेखन करत असत, असे खंडाळकर यांनी सांगितले. 

www.suvarndip.com

  ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर खंदारे यांनी सांगितले की, वाघोलीकर हे बातमीला न्याय देत असत. बातमीला आकर्षक मथळा देऊन बातमीमध्ये जिवंतपणा आणण्याचे वाघोलीकराचे कौशल्य आमच्या स्मरणात आहे. असे ज्ञानेश्वर खंदारे म्हणाले. याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश पवार यांनी कार्यक्रमाचा हेतू विशद करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आणि आभार देखील मानले. यावेळी या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार रशपालशिंग अट्टल, खान एजाज अहमद, जगन्नाथ सुपेकर, प्रशांत पाटील, रंधवे पाटील, आकाश सपकाळ, तुळशीराम निकाळजे, मलिक सिद्दिकी, आदी पत्रकार उपस्थित होते

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!