सुवर्ण दिप
हेडलाईन्स, 8 जुलै 2021
▪️राज्यातील कोविडमुक्त भागात आठवी ते बारावीच्या शाळा 15 जुलैपासून सुरू होणार! राज्य शासनाचा टप्याटप्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय. मात्र, गावात किमान महिनाभर आधीपासून एकही कोविड रुग्ण नसावा.
▪️मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात 36 नव्या मंत्र्यांचा समावेश, सात राज्यमंत्र्यांना प्रमोशन, राज्यातून नारायण राणे, डॉ भागवत कराड, डॉ. भारती पवार आणि भिवंडीच्या कपिल पाटील यांची वर्णी.. केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे आठ जण
▪️दिग्गज अभिनेते दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड, दीर्घ आजारानंतर वयाच्या 98 व्या वर्षी मुंबईत निधन. दिलीपकुमार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
▪️'लखलखता तारा निखळला', दिलीप कुमारांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेते भावूक. 'जेव्हा भारतीय सिनेमाचा इतिहास लिहिला जाईल...' बिग बी अमिताभ बच्चन भावूक, बॉलिवूड शोकमग्न.
▪️सीडी लावण्याची भाषा करणाऱ्या एकनाथ खडसेंना ईडीचा दणका; खडसेंचे जावई गिरीश चौधरींना भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहारप्रकरणी अटक. एकनाथ खडसे यांनाही समन्स, कार्यालयात हजर राहण्याचे आदेश.
▪️UEFA EURO : इटलीची अंतिम फेरीत धडक; पेनल्टी शूट-आऊटमध्ये ४-२ अशी स्पेनवर मात. अंतिम फेरीत इटलीसमोर, इंग्लंड आणि डेन्मार्क सामन्यातल्या विजेत्या संघाचं आव्हान.
▪️देशात पुन्हा एकदा दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत वाढ, गेल्या 24 तासांत 43,733 रुग्णांची नोंद. राज्यात मंगळवारी 10,548 रुग्णांना डिस्चार्ज, 8,418 रुग्णांची भर.
▪️राज्याचे माजी मंत्री, ज्येष्ठ माजी कॉंग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश.
▪️उत्तर प्रदेशातील एका गावातील किछा नदीपात्रात पुन्हा तीन मृतदेह आढळून आले. त्यांची ओळख पडली असून हे तिन्ही तरुण मुलांचे मृतदेह आहेत.
▪️5 जी नेटवर्क विरोधात याचिका दाखल करणाऱ्या अभिनेत्री जुही चावला आणि अन्य दोन जणांना दिल्ली हायकोर्टाने केलेला 20 लाख रुपये दंड भरण्यासाठी आठवड्याची मुदत.
▪️राज्यात मान्सून परतला; आगामी 5 दिवस पुण्यासह अनेक जिल्ह्यात पावसाची रिपरिप, हवामान खात्याचा अंदाज. राज्याच्या किनारपट्टी परिसरात कमी दाबाचा पट्टा कार्यरत. राज्यात चांगल्या पावसाची शक्यता.
▪️Share Market : पहिल्यांदाच शेअर बाजाराने ओलांडला 53000 हजारांचा टप्पा, निफ्टीही विक्रमी स्तरावर बंद. बाजारातील तेजीमध्ये टाटा मोटर्सचा साठा चर्चेत.
▪️महेंद्रसिंग धोनीच्या वाढदिवसालाच गौतम गंभीरनं बदलला फेसबूकचा कव्हर फोटो; माहिचे चाहते भडकले. गंभीरने २०११च्या वर्ल्ड कप फायनलमधील त्याचा फोटो ठेवला.
▪️पुण्यातील बालेवाडी येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास लवकरच सुरूवात : क्रीडामंत्री सुनील केदार यांची विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रो.डी.पी.सिंग यांच्यासोबत चर्चा.
✒️ महाराष्ट्रात 1,14,625 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 58,81,167 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,23,857 रुग्णांचा मृत्यू
✒️ मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीची संचित रजेसाठी उच्च न्यायालयात याचिका; राज्य सरकारला नोटीस, तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश
✒️ नंदुरबार: तळोदा बोरद रस्त्यावर दोन दुचाकींची धडक, 10 वर्षीय बालकासह पाच जणांचा जागीच मृत्यू
✒️ रँकिंग: टी -20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या दहामध्ये केएल राहुल आणि विराट कोहली हे दोनच भारतीय फलंदाज; पहिल्या 10 मध्ये एकही भारतीय गोलंदाज नाही
✒️ औरंगाबाद: बिल्डरकडून 15 लाख रुपयांची खंडणी घेताना आरटीआय कार्यकर्त्याला सिटीचौक पोलिसांनी पकडलं
✒️ पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांची संख्या हा राज्याचा विशेषाधिकार, राज्याच्या निर्णयात भेदभाव नसल्याचा हायकोर्टाचा निर्वाळा
✒️ आंबिल ओढा झोपडपट्टीवरील कारवाई बेकायदेशीर, पुणे पालिकेच्या कारवाईची स्वतंत्र चौकशी करा; मंत्री नितीन राऊत यांचे मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र
✒️ यूरो कप: उपांत्य फेरीत इंग्लंडनं इतिहास रचला; डेन्मार्कचा इंग्लंडनं 2-1 ने पराभव करत पहिल्यांदाच यूरो चषकाच्या अंतिम फेरीत मिळवली जागा
✒️ भारतात 4,54,865 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 2,98,36,465 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,05,057 रुग्णांचा मृत्यू
✒️ इंधनदरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसचे 10 दिवस आंदोलन, आज गुरुवारी सर्व विभागीय आयुक्त मुख्यालयी सायकल यात्रा - प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
✒️ अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेसबुक, ट्विटर आणि गुगल विरोधात खटला दाखल करणार
✒️ उल्हासनगर धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून समितीची घोषणा