नागपूर वनविभागाच्या चमुव्दारे वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या आरोपीला मध्यप्रदेशात धाड टाकून अटक...

अनामित
नागपूर विशेष प्रतिनिधी (अ‍ॅड बसवराज होसगौडर) दिनांक २९ /०७ /२०२१ रोजी रात्री ९ .३० वाजेच्या समुरास नागपूर वनविभागाच्या चमुव्दारे मध्यप्रदेशातील बिछवासहानी या गावात धाड टाकून वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या मोतीलाल केजा सलामे, वय ५५ ,रा. बिछवासहानी या आरोपीस ताब्यात घेतले आहे. 

सदर कार्यवाहीत नागपूर वनविभागाच्या चमुने सदर आरोपीच्या शेतशिवारातील घरातून मृत वाघाची संपूर्ण कातडी -१ , पायाचे पंजे -४ व आरोपीचा जिओ कंपनीचा मोबाईल -१ जप्त केले . सदर वनगुन्हा प्रकरणी आरोपी मोतीलाल केजा सलामे , वय ५५ , यांचेविरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम , १ ७२ चे कलम २ ( १६ ) , ९ , ३ ९ , ४ ९ , ४३ ( ए ) , ५० व ५१ नुसार वनगुन्हा क्र .०४ ९ ८० / १२४४७६ , दि .२ ९ / ०७ / २०२१ गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. [ads id='ads1]
सदर प्रकरणात अधिक चौकशीकरीता नागपूर वनविभागाव्दारे मा.प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी , सावनेर यांचे न्यायालयातून आरोपी यांना दि .०३ / ०८ / २०२१ पर्यंत वन कोठडी मिळालेली आहे . उपरोक्त कार्यवाही ही नागपूर वनविभागाव्दारे डॉ . भारत सिंह हाडा, उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग , नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख श्री . एन.जी.चांदेवार, सहाय्यक वनसंरक्षक ( जंकास -२ ) उमरेड , श्री. पी.एन. नाईक, वनपरिक्षेत्र अधिकारी , खापा, श्री. एल.व्ही . ठोकळ, वनपरिक्षेत्र अधिकारी , बुटीबोरी, श्री . एस.बी.मोहोड, वनपरिक्षेत्र अधिकारी, फिरते पथक, क्र. २ नागपूर व खापा वनपरिक्षेत्रातील वनरक्षक श्री.डोंगरे, श्री .शेंडे आणि श्री.भोसले यांचेव्दारे सदर कार्यवाही करण्यात आली असून प्रकरणात पुढील तपास श्री.एस.टि.काळे, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू व कॅम्पा) नागपूर यांच्या मागदर्शनाखाली सुरू आहे .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!