रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) रावेर येथील जय झुलेलाल सिंधी समाज सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी दिलीप तोलानी तर सचिवपदी कमल खटवानी यांची एकमताने निवड आज दि. ३० जुलै शुक्रवार रोजी करण्यात आली आहे.
नुकतीच सिधी समाज बांधवांची बैठक पार पडली यात नुतून कार्यकारणी घोषित करण्यात आली. अध्यक्षपदी दिलीप रामचंद्र तोलाणी,उपाध्यक्षपदी दीपक रेवतानी,सचिवपदी दीपक खटवानी, कार्यकारणी सदस्यपदी राजेश जेसवानी,विनोद खानचंदानी,मनीष तोलानी,विजय गुरबधानी,अनिल कोटवानी,जितु कोटवानी,सोनू मनवानी,संजय कोटवानी,दिनेश चंदनानी,दिलीप चंदनानी यांची निवड करण्यात आली आहे.यावेळी सिंधी समाज बांधवानी नुतन कार्यकारणीचे स्वागत अभिनंदन केले.


