रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) सावदा येथे फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा आज दि.३० जुलै शुक्रवार रोजी सत्कार करून त्यांना सावदा पोलीस ठाण्यात निरोप देण्यात आला. यावेळी मुक्ताईनगर उपविभागीय अधिकारी विवेक लावंड, भुसावळ पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सावदा सहा.निरीक्षक डी.डी.इंगोले, उपनिरीक्षक आर.डी.पवार आदी उपस्थित होते. उपअधीक्षक पिंगळे यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक किचकट गुन्ह्यांची उकल केल्याने त्यांचे कार्य सदैव आम्हास प्रेरणा देत राहिल, असे प्रतिपादन सावदा सहा.निरीक्षक देविदास इंगोले यांनी केले. सावदा येथील हवालदार संजय चौधरी यांचे वडील एकनाथ काशीनाथ चौधरी हे देखील पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.


