जळगाव : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तरं महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे ऑनलाईन परीक्षेच्या बिलाचा 5 कोटी, 3 लाख, पंच्यानव हजार रुपये, ईतका अवाढव्य खर्च दाखविण्यात आला आहे.या बाबत सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने भ्रष्टाचार बाबत प्रभारी कुलगुरू यांना दिनाक 4 जुन 2021 रोजी, निवेदन देण्यात आले होते.सबंधित ठेकेदार आणि विद्यापीठ परीक्षा व मुल्य मापन मंडळ संचालक बी.पी.पाटील ( सध्या कार्यरत नासिक विद्यापीठ ) व प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांनी संगनमत करून शासनाची दिशाभुल करून कोट्यावधी रुपयाचा भस्टाचार केलेला आहे.
[ads id='ads1]
यांची सखोल चौकशी होण्या बाबत प्रा.संजय मोरे अण्णा सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा राष्ट्रीय मानव अधिकार महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि कृष्णा सावळे सर्व शक्ती सेना विद्यार्थी संघटना जळगाव जिल्हा अध्यक्ष यांनी दिनांक 19 जुलै 2021 रोजी, भगतसिंह कोश्यारी (राज्यपाल) मा. उद्घव रावजी ठाकरे ( मुख्यमंत्री) मा.ना. उदय सामंत उच्य तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात आले.त्या पत्राची प्रत, प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांना पुन्हा दुसऱ्यांदा सबंधित ठेकेदार आणि विद्यापीठातील बी.पी.पाटील, डॉ. एस.आर .भादलीकर यांनी संगनमत करुन केलेल्या भस्टाचाराची चौकशी करण्या बाबत निवेदन देण्यात आले. संबंधित ठेकेदार ,कर्मचारी यांची सखोल चौकशी त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्या कडून संपुर्ण रक्कम वसूल करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
आम्हाला 8 दिवसात न्याय मिळवून द्यावा.8 दिवसांत संबंधित ठेकेदार आणि विद्यापीठातील कर्मचारी याची चौकशी न झाल्यास सर्व शक्ती सेना कार्यकर्ते समवेत 15 आगस्ट 2021 रोजी, बहीणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याचे प्रा. संजय मोरे सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा राष्ट्रीय मानव अधिकार महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, कृष्णा सावळे सर्व शक्ती सेना विद्यार्थी संघटना जळगाव जिल्हा अध्यक्ष यांनी कुलगुरु यांना निवेदन देताना सांगितले आहे.
