निंबोल वार्ताहर (विनोद कोळी) प्राथमिक आरोग्य केंद्र ऐंनपुर मार्फत दि 30 रोजी नवीन निंबोल ता,रावेर.येथे नुकतेच Covid19 लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते,
आरोग्य विभागाने नुकतेच Covid19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता घेता, जो कोणी अपंग असो वा जेष्ठ नागरिक या लोकांसाठी गावो गावी शिबिरचे उपक्रम खासकरुन राबविले जात आहे.
[ads id='ads1]
आज दिनांक 30/07/2021शुक्रवार या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्र ऐनपुर मार्फत नवीन निंबोल या गावात Covid19 या आजारावर नियंत्रण रोखण्यासाठी विशेषतः लसीकरण शिबीरे घेण्यात आले .या शिबिरचे अयोजन जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा या ठिकाणी केले.
लसीकरण ठिकाणी मेडिकल आफिसर, डॉ,चौरे, आरोग्य सेवक, चंदनकर सिस्टर्स, आशासेविका. तसेच गावातील कार्यकर्ते सरपंच, संजय पाटील, उपसरपंच, अशोक पाटील, पोलिस पाटील, योगेश पाटील. विनायक गुरूजी, तसेच ग्रामपंचायत सदस्य, आणि गावातील प्रतिष्ठित कार्यकर्ता यांचे खुप मोठे योगदान लाभले