कळवण वार्ताहार (सुशिल कुवर) देवळा एज्युकेशन सोसायटी,संचालित,जिजामाता कन्या विद्यालय,देवळा येथे आज दि. २९ जुलै २०२१ रोजी एप्रिल- २०२१ च्या शालांत परीक्षेत (दहावी) प्रथम पाच नंबर मिळविणाऱ्या विद्यार्थिनींचा गुण गौरव करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला. या गुण गौरव आयोजनाचा हेतू विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. ठोके एस.टी.सर यांनी प्रास्ताविकामध्ये सविस्तर माहिती स्पष्ट केली.
यात प्रथम पाच नंबर मिळविणाऱ्या विद्यार्थिनी मध्ये प्रथम नंबर कु. वैष्णवी निकम व कु. सृष्टी शिंदे, द्वितीय नंबर कु. नैनिका जाधव, तृतीय नंबर कु. प्रांजल थोरात व कु. मानसी जगताप, चौथा नंबर कु. स्नेहल पाटील व पाचवा नंबर कु. पायल पगार या विद्यार्थ्यांनीनी पटकावला आहे.
[ads id='ads1]
शालांत परीक्षेत गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळविणाऱ्या विद्यालयातील कु. नैनिका जाधव व कु. अनुष्का गुंजाळ व या सर्व विद्यार्थिनींना गणित विषयाचे मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री.पंकज जाधव सर यांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
या विद्यार्थिनींचा व पालकांचा गुणगौरव, सत्कार देवळा ऐज्युकेशन सोसायटी चेअरमन व प्राचार्य मा. हितेंद्र आहेर (बापूसाहेब), सेक्रेटरी मा. गंगाधर शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बापुसाहेबांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनींना शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.मोरे आर.ए यांनी विद्यार्थिनींना काव्यमय मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी गुणवंत विद्यार्थिनींचे आईवडिल तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.आहेर एस. एन यांनी व आभर प्रदर्शन श्री. बत्तीसे जे.टी यांनी केले.