रावेर (सुवर्ण दिप वृत्तसंस्था ) आज दि.30 जुलै 2021 रोजी सौ.कल्पनाताई दिलीप पाटील उपशिक्षिका जि.प.प्राथमिक शाळा निंबोल ता-रावेर यांना जळगाव जि.प.चा. 2020/21 चा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पदवीधर आमदार डाँ.सुधीरजी तांबे यांचे प्रतिनिधी श्री सुदाम राऊत सर,व आशुतोष जाधव सर तसेच रावेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या विद्यानगर,रावेर येथील निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अ.जमाती तथा आदिवासी सेलचे जिल्हा अध्यक्ष श्री दिलरुबाब इकबालखाँ तडवी,सरचिटणीस श्री रामदास लहासे,सचिन थोरात, इ.पदाधिकारी व श्री दिलीप पाटील सर उपस्थित होते.
सौ.कल्पनाताईं पाटील यांना जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल आ.सुधीरजी तांबे यांच्या प्रतिनिधींकडून सत्कार
शनिवार, जुलै ३१, २०२१