Jalgaon Breaking : कीटकनाशक दुष्परिणामांवर उपचारासाठी अधिकाऱ्यांची कार्यशाळा संपन्न

अनामित
कोविडच्या अनुषंगाने दक्षता व आवश्‍यक उपचाराबाबत आरोग्य यंत्रणेने सजग रहावे- जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जळगाव :  शेतकरी बांधव कीटकनाशकांचा वापर करीत असताना त्याचे होणारे दुष्परिणाम व त्यावर करावयाचे आवश्यक उपचार याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सजग रहावे. जेणेकरून कीटकनाशकापासून विषबाधेसारख्या दुर्घटना टळू शकतील. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी डॉक्टरांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात केले.
[ads id='ads1]
कृषी आयुक्तालय, कृषी विभाग, पुणे, क्रॉप लाइफ इंडिया व शिवार फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पहिलीच कीटकनाशकापासूनचे दुष्परिणाम टाळण्यासाठी दक्षता, उपचार व व्यवस्थापन याबाबत जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत ऑनलाइन झाली, यावेळी ते बोलत होते. 

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार , शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.के. ठाकुर, कृषी उपसंचालक अधिकारी अनिल भोकरे, मेडिकल कौन्सिल अध्यक्ष डॉ. चौधरी, क्रॉप लाइफचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तित्व सेन, बायरचे सुशिल देसाई, शिवार फाऊंडेशनचे विनायक हेगाणा आदी उपस्थित होते. 
[ads id='ads2]
  कार्यशाळेचे प्रशिक्षक तथा केंद्र शासनाचे माजी आरोग्य अतिरिक्त महासंचालक डॉ. देवव्रत कानुंगो यांनी जिल्ह्यातील ५०० पेक्षा जास्त प्राथमिक आरोग्य यंत्रणेचे डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षणार्थी डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी यांना कीटकनाशकामुळे विषबाधा झाल्यानंतर जिल्ह्यातील दुर्घटना टाळण्यासाठी विविध उपाययोजना व कोविड यातील फरक, विषबाधा झाल्यानंतर डॉक्टरांनी करावयाची विविध उपचार पद्धती, औषधांची उपलब्धता याची शास्त्रोक्त माहिती दिली. 

  कृषी विभागाची शिफारस असो किंवा नसो शेतकरी बांधवांकडून अनेक उत्पादने एकत्र करून रसायने तयार केली जातात. अशावेळी दुष्परिणाम घडल्यास द्यावयाचा अँटी-डोस याविषयी अद्यावत माहिती असावी. तसेच कृषी व आरोग्य विभागाकडून जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जातात याबाबत कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे मुख्य गुणनियंत्रण अधिकारी, कृषी आयुक्तालय, पुणे श्री. सुनिल बोरकर यांनी संबोधित केले. याचबरोबर उस्मानाबाद व यवतमाळ जिल्हय़ातून 1100 पेक्षा जास्त वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सेन यांनी प्रस्तावना तर शिवार फौंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी आभार मानले.

कीटकनाशकांमुळे जगात दरवर्षी दोन लाख बळी : डॉ. देवदत्त कानुंगो.
कीटकनाशके किंवा तत्सम विविध रसायनांच्या वापरामुळे जगात दरवर्षी दोन लाख मृत्यू होत असल्याची नोंद आहे, असे डॉ. देवव्रत कानुंगो यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, कीडनाशकांची सहज उपलब्धता दोन रसायनांचे मिश्रण फवारणीच्या घटना, फवारणीचा लांब कालावधी, संरक्षण किटशिवाय फवारणी, सदोष फवारणी यंत्राचा वापर व योग्य उपचार न मिळणे अशी अनेक कारणे विषबाधेने बळी जाण्यामागे असतात. कीटकनाशकांचे तात्कालिक तसेच दीर्घकालीन दुष्परिणामही होत असतात. त्यामुळे सर्वांनीच पुरेशी काळजी घेतली गेली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!