किती मार्कांची आणि कोणत्या विषयांची असेल CET परीक्षा ? पहा परीक्षेचं स्वरूप..
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा केली होती.
त्यानुसार आता ही परीक्षा ऑगस्टमध्ये होणार आहे. मात्र यासाठीची नोंदणी प्रक्रिया 19 जुलैपासून सुरू झाली आहे.
ही परीक्षा नक्की कशी असणार?
● परीक्षा पूर्णपणे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल
● इंग्रजी (English), गणित (Maths), विज्ञान (Science) आणि सामाजिक शास्त्र (Social Science) या विषयांवर प्रत्येकी 25 मार्कांचे प्रश्न असतील
● एकूण 100 मार्कांची ही परीक्षा असणार आहे
● प्रवेश परीक्षेसाठी 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे.
● परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असणार आहे.
● CET प्रवेश परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाऊन ही परीक्षा द्यावी लागणार आहे.
परंतु जे विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देऊ इच्छित नाही त्यांना परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनंतर अकरावीत प्रवेश मिळणार आहे. त्यांचे मूल्यमापन हे दहावीच्या गुणांच्या आधारे होणार आहे.