सहस्त्रलिंग लालमातीच्या जंगलातुन कत्तलीसाठी नेणारे ८ गायी ताब्यात घेवुन ३ आरोपी विरूद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अनामित
रावेर वार्ताहर (राजेंद्र अटकाळे) आज सायंकाळी 5 : 30 वाजेेेेच्या सुमारास रावेर तालुक्यातील सहस्त्रलींग, लालमाती च्या जंगलात मुख्य रस्त्यापासुन 5 कि.मी.अंतरावर जंगलात ७०, ००० रुपये किमतीच्या ८ गायी कत्तलीसाठी नेताना ३ आरोपी विरुध्द रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पोलीस सुत्रा कडून मिळालेली माहीती अशी की, कुर्बान तडवी रा.मारुळ ता.यावल जि.जळगांव 2) मजीत गबु तडवी  3) फिरोज गुलजार तडवी  दोघ रा.आभोडा बु।।ता.रावेर (मजकुर यांनी गैरकायदा विनापास परमीट शिवाय ७०,००० किमंतीच्या ८ गायी कत्तलीच्या उद्देशानने गुरांना काठीने जोर जोरात मारहाण करुन पळवुन तसेच त्यांची कुठल्याही प्रकारे चारा पाण्याची सोय न ठेवता भुखेल्या अवस्थेत पायी घेवुन जात असतांना मिळुन आला म्हणुन गुन्हा.
[ads id='ads1]
रावेर पोलीस ठाण्यात  पो.कॉ.दिपक ठाकूर यांनी फिर्याद दिल्याने आरोपी कुर्बान मुजाहीद तडवी रा.मारुळ ता.यावल ,मजीत गबु तडवी , फिरोज गुलजार तडवी  दोघ रा.आभोडा बु।।ता.रावेर याचे वर रावेर पोलीस स्टेशन (भाग-6 ) गुरन 246/2021 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे सुधारीत 2015चे  कलम 5,(ब), 9,11 (अ), (ड) ,(ह) प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन कुर्बान मुजाहीद तडवी रा.मारुळ ता.यावल याला अटक करण्यात आली आहे.

सदरच्या नमूद -८ गाई RC बाफना गौशाला जळगाव येथे दाखल केला असून नमुद्ची कारवाई पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे की राजेंद्र राठोड,पो कॉ नरेंद्र बाविस्कर,पो कॉ दीपक ठाकूर,पो कॉ संदीप धनगर,पो कॉ प्रदिव सपकाळे यांनी केलेली आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!