मुक्ताईनगर : कोविड 19 या महामारीत गेल्या वर्षभरापासून ते आजपर्यंत सातत्याने कंत्राटी कर्मचारी यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची रात्र दिवस सेवा बजावून आरोग्य यंत्रणेला आधार दिला. असे असताना जळगांव जिल्हा परिषद विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक , जळगाव यांनी काढलेल्या आदेशानुसार सर्वच कंत्राटी कर्मचाऱ्यांना कर्तव्यावरून कमी करण्यात आले आहे .
[ads id='ads1]
कर्मचाऱ्यांनी गेले वर्षभरापासून कोरोनासारख्या महाभयंकर परीस्थितीत रात्रंदिवस कामे केली अशा कर्मचार्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार जेथे शक्य असेल तिथेच आरोग्य विभागाच्या इतर योजनांमध्ये समावेश करावे असे निवेदन मुक्ताईनगर येथे कर्तव्यदक्ष कोविड 19 चे डॉक्टर्स , परिचारिका , वॉर्डबॉय , फार्मसिस्ट यांच्या तर्फे तहसिलदारांना श्वेता संचेती यांना देण्यात आले.

