रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) पोलीस स्टेशन येथे येणारे सण -उत्सव संदर्भात पोलीस पाटील तसेच,महिला दक्षता कमेटीची मीटिंग Dysp श्री नरेंद्र पिंगळे व पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली आज दि.५ जुलै सोमवार रोजी रावेर पो स्टे ला घेण्यात आली.असता गणपती उत्सव संदर्भात शासनाचे आलेले परिपत्रकाची माहिती देण्यात आली,सार्वजनिक गणपती मंडळाने पोलीस, महापालिका, स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे,
[ads id='ads1]
कोव्हीड-19 संदर्भात उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता मर्यादित मंडप उभारावा, भपकेबाज सजावट न करता,सार्वजनिक मंडळा करिता 4 फूट व घरगुती गणपती बसविण्यात 2 फूट उंचीचेच मूर्ती बसविण्यास परवानगी आहे,यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू/संगमवर मूर्तीचे पूजन करावे,नजीकच्या कृत्रिम स्थळी विसर्जन करावे,उत्सवाकरिता देणगी स्वेच्छेने दिल्यास स्वीकारावी,जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित करू नये,आरोग्य विषयक शिबिरे(रक्तदान)आयोजित करावी,स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित करावे, आरती, भजन, कीर्तन, अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही ध्वनी प्रदूषणहोणार नाही याचे पालन करावे,गणेश दर्शनाची सुविधा ऑनलाइन केबल नेटवर्क,फेसबुक,इत्यादी द्वारे व्यवस्था करावी,फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करावे,मास्क,सॅनिटायझर चा वापर करावा,गणपती आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नये,लहान मुले,वरिष्ठ नागरिक यांनी विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे,एकत्रित मिरवणुकीस परवानगी नाही,कृत्रिम तलावात विसर्जन करावे,शासनाने ठरवून दिलेले अटी-नियमाचे सर्वांनी पालन करावे,असे मार्गदर्शन केले
तसेच बकरी-ईद संदर्भात शासनाचे परीपत्रकाप्रमाणे कोव्हीड-19 मुळे उदभावलेले संसर्गजन्य परिस्थितीमुळे सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद,ईदगाह ,अथवा सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा न करता नागरिकांनी आपआपले घरीच नमाज अदा करावी, जनावरांचे बाजार बंद राहील, नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी, कोव्हीड ब्रेकिंग द चैन निमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही,ईद निमित्त कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमू नये,गर्दी करू नये,शासनाचे परिपत्रकाचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले.
तसेच Dysp नरेंद्र पिंगळे यांचा 58 वा वाढदिवस व पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचा 56 वा वाढदिवस झालेने एकूण- 114 झाडे (वड, पिंपळ ,चिंच, आवळा, सीताफळ, अश्या झाडाचे प्रत्येक पोलीस पाटील,दक्षता कमिटी सदस्या यांना प्रत्येकी एक झाड देऊन झाडे लावा झाडे जगवा,हा अमूल्य संदेश सुद्धा दिला, ह्या अमूल्य उपक्रमामुळे उपस्थितांनी आनंद व्यक्त केला आहे.
