औरंगाबाद वार्ताहर (प्रमोद धुळे) शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असतं कारण शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते जसे आई-वडिलांनंतर शिक्षकांकडून बर्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात.तसेच शिक्षकांना दुसरे पालक ही म्हटले जाते आपले विचार ,मत आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाट असतो. [ads id='ads1]
चांगले संस्कार, आणि योग्य शिक्षणा देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याचा महत्त्व समजवण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी परिवर्तन व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र औरंगाबाद येथील विद्यार्थी यांनी आज राजकुमार कांबळे सर यांनायुवा परिवर्तन व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र औरंगाबाद ला अचानक भेट दिल्याने त्यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.या ठिकाणी खरोखरच शिक्षकांन प्रती विद्यार्थ्यांचे प्रेम हे आज प्रत्यक्ष बघायला मिळाले सत्कार यावेळी प्रमोद धुळे सर,ज्योती दिवसे मॅडम,प्रा.प्रवीण आव्हाड सर,राष्ट्रपाल मगरे,कान्हा गोरे,तृप्ती उबाळे,आदित्य ब्राह्मणे,जान्हवी इंगोले,अनुजा वाटोडे,वैभव गोरे, प्रणव राऊत, सुमन गोरे आदींची यावेळी उपस्थिती होती*

