Raver : तांदलवाडी परिसरात कृषी पंपाच्या केबल चोऱ्या थांबेनात! शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण...

अनामित
रावेर (प्रमोद कोंडे) रावेर तालुक्यातील तांदलवाडी Tandalwadi परिसरात कृषी पंपाच्या वायरी चोऱ्यांचे प्रमाण काही बंद होतांना दिसत नाही.यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून जणू काही चोरटयांनी पोलिस प्रशासनास आव्हान दिल्याचे चित्र दिसून येत आहे. चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांचा मनस्ताप वाढला आहे. तसेच आर्थिक नुकसान होत आहे.पोलिसांची रात्रीची गस्त वाढवण्यात आली असल्यावरही परिसरात चोऱ्या सुरूच आहेत.
[ads id='ads1]
शुक्रवारी रात्री दि २ रोजी चोरटयांनी पुन्हा (वाढीव सावदा पाणी पुरवठा योजनेच्या पम्पगृहाजवळून) कृषी पंपाच्या केबल चोऱ्या केल्यात.यात तांदलवाडी येथील सुभाष महाजन यांची ५०० फूट केबल, गोपाल महाजन यांची १०० फूट केबल तर विजय हिवराळे (रा. मांगलवाडी )यांची ४५० फूट केबल चोरीला गेली.
  मार्च महिन्यात जगदीश नमायते व गोपाळ महाजन रा.तांदलवाडी या शेतकऱ्यांच्या ५०० फूट केबल वायर चोरीला गेल्या होत्या,दि.२७ मे ला भूषण चौधरी व शांताराम चौधरी या शेतकऱ्यांच्या १२००फूट केबल वायर चोरीस गेल्या होत्या त्यानंतर लगेच तीन दिवसात पुन्हा दि ३० मे रोजी रात्रीच्या वेळी नव्याने टाकलेल्या ६०० फूट वायर चोरून नेल्या घटनेला महिना होत नाही तोच शांताराम चौधरी,के.टी. पाटील,दीपक चौधरी, जगदीश नमायते,गोपाळ महाजन सर्व रा.तांदलवाडी राहूल हिवराळे व बाळकृष्ण हिवराळे रा. मांगलवाडी या शेतकऱ्यांच्या केबल वायर दि.२४ जूनच्या मध्यरात्री चोरीला गेल्या होत्या.या सततच्या चोऱ्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक व मानसिक त्रास होत आहे.शेतकरी सुभाष महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध निंभोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. निंभोरा पो.स्टे. ला खबर मिळताच 
[ads id='ads2]
निंभोरा पो.स्टे.चे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी येऊन घटनास्थळी भेट दिली. यावेळी वैभव महाजन,अक्षय चौधरी, सुनिल महाजन तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.पोलीस नाईक ईश्वर चव्हाण तपास करीत आहे. परिसरात रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे तसेच रात्रीच्या वेळी वाहनांची तपासणी करण्यात येत असूनही या चोऱ्या सुरूच असल्याने शेतकरी धास्तावलेले असून पूर्णपणे हतबल झालेले आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!