व्यापाऱ्यावर निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल.
रावेर( प्रमोद कोंडे) निंभोरा बु. येथून जवळच असलेल्या खिर्डी बु . येथील शेतकरी केतन शांताराम भंगाळे यांचे व्यापारी ईस्राईल सुलेमान पिंजारी यांच्याकडे असलेल्या कापसाचे वर्षभरापासून पैशांची मागणी केली मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून व्यापारी ईस्त्राईल पिंजारी टाळाटाळ करीत असून त्याच्याकडे या तरुण शेतकऱ्यांनी पैशांची मागणी केली असता व्यापाऱ्यासोबत असलेल्या इस्माईल सुलेमान पिंजारी याने केतन शांताराम भंगाळे या शेतकऱ्यास मारहाण केली.
[ads id='ads1]
त्या संदर्भातील तक्रार केतन शांताराम भंगाळे यांनी निंभोरा पोलिसांत केतन भंगाळे यांनी तक्रार दाखल केल्यावर या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी सदर व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी निंभोरा पोलीस ठाण्यात भेट दिली.या संबंधी उद्या अनेक शेतकरी तक्रार देणार असल्याचे समजते.दरम्यान खुद्द व्यापाऱ्याने शेतकऱ्याचा माल खरेदी करीत फसवणूक करीत पैसे देण्यास टाळाटाळ करून वर दमदाटी व शेतकऱ्यास मारहाण केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
याबाबत निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते तर संशयीत आरोपीस अटक करून निंभोरा पोलिसांत आणण्यात आले होते.याबाबत तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. योगेश शिंदे,ए .एस .आय .अनवर तडवी करीत आहेत.