Good Morning Maharashtra : आजच्या ठळक घडामोडी (हेडलाईन्स, 4 जुलै 2021)

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

साप्ताहिक - सुवर्ण दिप 

    हेडलाईन्स, 4 जुलै 2021

▪️राफेल विमानांच्या खरेदीवरून फ्रान्समध्ये खळबळ. चौकशीसाठी न्यायाधीशांची नियुक्ती. पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेज की फाइनेंशियल क्राइम ब्रांच (PNF) चे आदेश. राफेल डीलवरून काँग्रेसचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, 'चोर की दाढी...'

▪️महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन येत्या 5 आणि 6 जुलैपासून. गेल्या काही दिवसांत राज्य सरकार विरुद्ध विरोधी पक्षात चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे अधिवेशन गाजण्याची चिन्हे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणारा चहापानाचा कार्यक्रम रद्द.

▪️पुष्करसिंह धामी यांच्याकडे उत्तराखंडची सूत्रे, राज्याचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तीरथसिंह रावत यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा.

▪️IND vs ENG : पृथ्वी शॉसाठी कसोटी संघाची दारे होणार खुली? इंग्लंडमध्ये बोलावले जाण्याची शक्यता. पायाच्या दुखापतीमुळे सलामीवीर शुभमन गिल किमान दोन महिने मैदानाबाहेर.

▪️WI vs PAK : वेस्ट इंडीजच्या दोन महिला खेळाडू भर मैदानात कोसळल्या, स्ट्रेचरवरून नेण्यात आले बाहेर. पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 लढतीदरम्यान घटना. सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला.

▪️चीनची आगळीक, लडाख सीमेवर युद्धाचे ढग? चिनी सैन्याची जमवाजमव; भारतानेही सज्ज केले 50 हजार सैनिक. भारतीय वायुसेनाही सज्ज. दोन्ही देशांमध्ये तणाव.

▪️क्रिकेटपटू हरभजन सिंग आता रुपेरी पडद्यावर झळकणार. 'फ्रेंडशिप' या तमिळ चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार. हरभजनच्या 41 वाढदिवसानिमित्त चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज.

▪️कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या; मनोरंजन सृष्टीतली युनियन्सची दहशत पुन्हा उघड. मनसेच्या अमेय खोपकर यांचा दहशत पसरवणाऱ्या संघटनांना इशारा.

▪️कल्याणच्या कोळसेवाडीत दोन तरुणांसह तरुणीला जमावाकडून बेदम मारहाण. कल्याण कोळसेवाडी मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल, 9 जणांना अटक.

▪️वर्ध्यात मृत कोरोना रुग्णाच्या अंगावरील सोन्याचा ऐवज लंपास; दीड महिन्यांनंतरही आरोपी मोकाट, कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत.

▪️कंगना रनौतचा दावा खोटा अन् कोर्टाची दिशाभूल करणारा; जावेद अख्तर यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका.

▪️दारुच्या नशेत मैत्रिणीची छेड काढणं टीव्ही कलाकाराला पडलं महागात.. दाक्षिणात्य अभिनेत्रीची छेड काढल्याप्रकरणी टीव्ही अभिनेता प्राचीन चौहानला अटक

▪️जेएनपीटीमध्ये आयात करण्यात आलेल्या कंटेनरमध्ये 879 कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त, इराणहून आलेला कंटेनर पंजाबला पाठवण्यापूर्वीच कस्टमची कारवाई.

▪️मुंबईनंतर नवी मुंबईत बोगस लसीकरण, 350 कामगारांचे बोगस लसीकरण करून लुटले 4 लाख 23 हजार रूपये.

▪️पायी वारीसाठी ठाम असणारे बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात. सामाजिक हित आणि परंपरांचा समन्वय साधण्यासाठी काही तडजोडी अनिवार्य, आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त अभय टिळक यांची भूमिका
✒️ केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात अधिवेशनात राज्य सरकार ठराव आणणार; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा ठराव आणण्यासाठी मंजूरी दिली जाणार 

✒️ लातूर: अचानक तोल गेल्याने मन्याड नदीपात्रात बुडून तीन भावंडांचा मृत्यू, एकाच चितेवर तिघांवर अंत्यसंस्कार; अहमदपूर तालुक्यातील घटना

✒️ महाराष्ट्रात 1,17,575 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 58,45,315 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,22,724 रुग्णांचा मृत्यू

✒️ औरंगाबादमध्ये ब्लू डर्ट कुरिअरने मागवल्या तलवारी; पाच तलवारी पुंडलीकनगर पोलिसांनी जप्त केल्या, तलवारी मागवणाऱ्याचा शोध सुरु

✒️ सरकारने डाळींच्या साठेबाजीला रोखण्यासाठी मुगडाळ वगळता सर्व डाळींसाठी साठवणुकीचे नियम लागू होणार; घाऊक, किरकोळ विक्रेते, आयातदार आणि गिरण्यांवर आता साठवणुकीचे निर्बंध 

✒️ ''राफेल व्यवहाराची फ्रान्समध्ये चौकशी होऊ शकते तर भारतात का नाही?'' काँग्रेसचा सवाल

✒️ आयसीआयसीआय प्रुडेन्शियलकडून ग्लोबल ऍडव्हान्टेज फंडाची घोषणा; या फंडाच्या माध्यमातून अमेरीका, जपान, हाँगकाँग यांसारख्या मोठ्या बाजारात गुंतवणूक करता येणार 

✒️ उत्तरप्रदेश: ओवेसी म्हणाले, "2022 मध्ये योगी आदित्यनाथांना मुख्यमंत्री बनू देणार नाही," मुख्यमंत्री म्हणाले, "आव्हान स्वीकारलं!"

✒️ ‘गोकुळ’ची तत्काळ दूध विक्री दरवाढ नाही; गोकुळ राज्यातील इतर दूध संघाशी दूध विक्री दर वाढीबाबत चर्चा करुन निर्णय घेणार
 
✒️ भारतात 4,80,203 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 2,96,50,169 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,02,015 रुग्णांचा मृत्यू

✒️ मी पत्र लिहू नये हीच तर तुमची हुकूमशाही! चंद्रकांत पाटलांचं अजित पवारांना प्रत्युत्तर

✒️ पावसाच्या ओढीने राज्यात चिंतेचे ‘ढग’; 11जुलैनंतर पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

✒️ बॉलीवूड सुपरस्टार अभिनेता रणवीर सिंह आता छोट्या पडद्यावर, द बिग पिक्चर' असं या 'क्विज शो' चं नाव असणार; ऑगस्ट महिण्यापर्यंत हा शो टेलिकास्ट होण्याची शक्यता

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!