अवैध गुरे वाहतूक प्रकरणी,रावेर पोलिसांकडून चार जणांना अटक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे)  मध्यप्रदेशातून अवैध गुरे वाहतूक प्रकरणी मोरव्हाल-रसलपुर दरम्यान तीन गुरे, महिंद्रा पीकअप गाडीसह सुमारे ५ लाख १८ हजाराचा ऐवज जप्त केला आहे. रावेर पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांना काल दि. ३ जुलै रोजी रावेर न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने दिली आहे.

       याबाबत रावेर पोलिसांनी दिलेली माहिती असे की मध्यप्रदेशातून शेरीनाका कडून मोरव्हाल ते रसलपुर गावाकडे येणारी महिंद्रा पिकप गाडी क्रमांक एम पी १० जी ३०२६ या पीकप गाडीत तीन गोवंश जातीचे गुरे अवैधरित्या नेत असताना पाल आऊट पोस्टचे पोलीस दीपक ठाकूर, संदीप धनगर, अतुल तडवी, नरेंद्र बाविस्कर हे रात्री गस्त घालत असतांना आढळून आले.

         या बाबत दिपक ठाकुर यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून पाच लाख रुपयांची पिकप व्हॅन, १८ हजार किमतीचे तीन गोवंश पोलीसांनी ताब्यात घेऊन याप्रकरणी दिनेश भिलाला, सुनिल भिलाला, राहूल भिलाला तिघे राहणार पाडल्या ( ता. झिरन्या ) मध्यप्रदेश व हसन शेख कय्यूम रा. रसलपूर (ता. रावेर ) यांचे विरुध्द रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीसांनी त्यांना अटक केली आहे.

       दिपक ठाकुर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून दिनेश भिलाला,सुनिल भिलाला,राहूल भिलाला तिघे राहणार पाडल्या ( ता . झिरन्या ) मध्यप्रदेश व हसन शेख कय्यूम रा . रसलपूर (ता. रावेर ) यांचे विरुध्द रावेर पोलीस ठाण्यात गु . र . नं . २१४/२०२१, आय पीसी कलम ४९८,४२७, प्राणी संरक्षण कायदा १९७६ कलम ५(अ)९ तसेच महाराष्ट्र पशु अधिनियम ( क)( ब)( ह)( क),मुंबई पोलीस अधिनियम कलम ११९ महाराष्ट् मोटार कलम ८३/१७७ पशु वाहतूक नियम कलम ४७ (अ)५० प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलीसांनी त्यांना अटक केली . त्यांना येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसांची (ता.५ जुलै पर्यन्त पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे . पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाली पुढील तपास पोलीस हेड कॉस्टेबल राजेंद्र राठोड करीत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!