रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
मौलाना आजाद सार्वजनिक वाचनालय कर्जोद तालुका रावेर येथे मान्यवरांचा सत्कार दि.३ जुलै शनिवार रोजी संपन्न झाला .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे युवानेते धनंजय चौधरी होते.प्रमुख उपस्थित म्हणून मुजलवाडी चे सरपंच योगेश पाटील,राजू चौधरी उपस्थित होते.यावेळी रावेर नगरपालिका दक्षता समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल संतोष लालचंद पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष धंनजय चौधरी यांचा वाचनालय तर्फे यांचा सत्कार सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मौलाना आजाद वाचनालयाचे अध्यक्ष शकील अब्दुल शेख,हाजी सरफराज शेख, इकबाल शेख, आशिष पाठक, शकील साहेबोद्दीन,अकिल शेख, जमील शेख,आदि उपस्थित होते
यावेळी डॉ हनीफ शेख यांनी कर्जोद गावातील कोरोना काळात गावातील नागरिकांची काळजी घेऊन आरोग्यसेवा बजावली म्हणून त्यांचा कोरोना युध्दा म्हणून धंनजय चैधारी यांनी सत्कार केला सुत्रसंचलन पत्रकार शकील शेख यांनी केले व आभार आशिष पाठक यांनी मानले.