रावेर (प्रमोद कोंडे) निंभोरा सिम गावापासून काही अंतरावर दोन कि.मी. अंतरावर बायपास रस्ता आहे.एक ते दीड वर्षापूर्वी या रस्त्याचे काम झाले होते. परंतु काही महिन्यांपूर्वीच रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न वाहनधारकांमध्ये दिसून येत आहे या रस्त्याचा पुर्ण बट्ट्याबोळ झाला आहे. रस्त्यावरून खूप मोठ्या प्रमाणात रहदारी असते रस्ता एवढा खराब झालेला आहे की वाहनधारकांना वाहन कसे चालवायचे असा प्रश्न निर्माण होतो.
निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरल्यामुळे रस्त्यात खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले दिसून येत आहे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी नाली बांधण्यात न आल्याने रस्ता काही महिन्यातच खराब होऊन खडी दिसायला लागली आहे.व ठिक ठिकाणी गड्डे पडले आहेत. वास्तविक हा रस्ता सिमेंट कांक्रेट मध्ये बनविण्यात आला होता, या रस्त्याची शासन स्तरावर चौकशी होऊन ठेकेदाराचे नावं काळ्या यादीत मध्ये टाकण्यात यावे. या रस्त्यावर वाहन चालवत असताना खड्ड्यांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे,असा वाहनधारकांमधून सूर उमटत आहे.वाहनधारकांनी रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे नाराजी व्यक्त केली आहे लवकरात लवकर रस्त्याचे त्वरित काम ठेकेदाराकडून करून घ्यावे. अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. नवनिर्वाचित आ. चंद्रकांत पाटील यांनी या रस्त्याची समस्या सोडवावी व मतदारांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी जोर धरत आहे.