![]() |
नवापूर- प्रतिनिधी (प्रकाश खैरनार )नवापाडा तालुका साक्री येथे नुकतीच वृक्षारोपण व मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमात विविध नवनवीन ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या लहान रोपांना म्हणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद असल्याकारणाने बारामती येथील चतुर्थ वर्षांमध्ये शिक्षण घेत असलेले कृषिकन्या अश्विनी चिमा देसाई यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत गावामध्ये वृक्षारोपण व कोरडवाहू शेती व्यवस्थापना संदर्भात सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सदर ग्रामपंचायत उमरपटा अंतर्गत करण्यात आला या प्रसंगी शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. [ads id='ads1] कार्यक्रमाचे उद्घाटन नावापडा येथील उपसरपंच पांडू बाबा काळगे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून कृषी पदविका व पदवी घेणाऱ्या सर्वांनी असा उपक्रम केल्यास गावाचा शेती विषयक विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन उपसरपंच पांडू बाबा काळगे यांनी केले.याप्रसंगी सीमा देसाई, ग्रामपंचायत सदस्य इलन कुवर, अर्जून बारीश, व गावातील जेष्ठ नागरिक जाण्या कुवर, बाबजी कुवर, जेठ्या कुवर, देवाजी देसाई ,सोमा देसाई व गावातील ग्रामस्थ व तरुणवर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गावातील नव युवकांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला. |
नावापाडा (उमरपाटा)गावात कृषिकन्या अश्विनी देसाई यांच्यामार्फत शेतीविषयी मार्गदर्शन व वृक्षारोपण...
बुधवार, जुलै १४, २०२१

