रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) रावेर येथे ओबीसी समाज जनजागृती संदर्भात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदची महत्वाची बैठक आज दि. १४ जुलै बुधवार रोजी रावेर येथे पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील होते .बैठकीला समता परिषदेचे विभागीय संघटक अनिल नळे, विभागीय निरिक्षक नितिन शेलार ,जळगाव जिल्हा युवकध्यक्ष भूषण महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत ओबीसी समाज वेळेवर एकत्रित न आल्यास येणाऱ्या पुढच्या पिढीला प्रचंड संघर्ष करावा लागणार आहे.राजकीय आरक्षण आता रद्द झाल्याने पुढील काळात बहुजन समाजाची वाताहात होणार आहे या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रमेश महाजन खानदेश माळी महासंघ मार्गदर्शक कांतीलाल, महाजन रामकृष्ण महाजन,श्रीराम महाजन, शामराव चौधरी,पिंटू महाजन,शेतमाल खरेदी विक्री संघ संचालक चिमनराव धांडे, पंकज वाघ, बक्षिपुर माजी सरपंच गणेश महाजन,दिनकर महाजन, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष प्रणित महाजन,गोकुळ महाजन आदी उपस्थित होते.