आ.संजय गायकवाड यांना अटक करून आमदारकी रद्द करा मागणीसाठी मलकापूर येथे वंचित बहुजन आघाडीचे आक्रोश आंदोलन व राज्यपालांना निवेदन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

मलकापूर जि.बुलढाणा (सुवर्ण दिप वृत्तसेवा) दडपशाहीचे,जातीयवादि, संविधानविरोधी वक्तव्य करणारे,बुलडाणा मतदार संघाचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड वर अट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा नोंदवून अटक करण्याच्या व विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या  मागणीसाठी  बुलडाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व तालुकाध्यक्ष सुशीलभाऊ मोरे यांचे नेतृत्वात तथा जी. संघटक भाऊराव उमाळे,भा.बौध्द महासभा जिल्हाध्यक्ष एस.एस वले यांच्या उपस्थितीत आज  मलकापूर तहसील चौक येथे  आक्रोश आंदोलन करण्यात आले. 

      यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्यावर ऍट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा,भा.द.वि.नुसार विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे, त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अस्त्र शस्त्र पुरवणे या वक्तव्याची सखोल चौकशी करून उच्चस्तरीय चौकशी समिती नेमन्यात यावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल यांना उपविभागीय अधिकारी मलकापूर यांचे मार्फत देण्यात आले. 

      या आक्रोश आंदोलनात जी.सचिव तुळशीराम वाघ,महीला ता अध्यक्षा दक्षशिला झनके,जी.उपाध्यक्षा रेखाताई नितोने,वंचित नेत्या मोगरा ताई शहर उपाध्यक्षा अलमनुर बी शेख, ता. उपाध्यक्ष दिलीप वाघ, गजानन झनके,विनोद निकम,विलास तायडे, गणेश सावळे, शेख यासीन कुरेशी, ता.सचिव नरसिंग चव्हाण,संघटक अजाबराव वानखेडे,समाधान चव्हाण,सुगदेव इंगळे, भा.बौ.म. तालुकाध्यक्ष राजू शेगोकार, कडू धुरंधर,वंचित आघाडीचे शहराध्यक्ष विलास गुरव,सचिन तायडे,जनार्दन इंगळे,दगडु राणे, नितीन वानखेडे, संतोष इंगळे,भीमराज मोरे,भीमराव नितोने, बाळू बावस्कर,सुपडा ब्राम्हणे सिद्धार्थ कोगळे,देवेंद्र इंगळे,एन.के.मोरे.देविदास इंगळे,उत्तम बोराडे,निंबाजी इंगळे, कुसुमताई तायडे पंचशीला इंगळे,रीना इंगळे,महेंद्र दामोदर, आबाराव शिंदे,सिद्धार्थ मोरे,जनार्दन कोंगले, विश्वा झालटे,विनोद गवई,प्रदीप खंडारे,मिलिंद सावळे,कडू फुळपगारे,अवसरमोल यांचेसह शेकडो महीला पुरुष  उपस्थित होते.




#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!