नवापूर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त ऑनलाइन परिसंवाद उत्साहात..

अनामित
गुरुपौर्णिमेनिमित्त गुरू-शिष्य संबंध यावर सखोल चर्चा...

नवापूर वार्ताहर (प्रकाश खैरनार) भारतीय शिक्षण मंडळ देवगिरी प्रांत आणि श्री सुरुपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापुर जिल्हा नंदुरबार आयोजित गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ऑनलाईन परिसंवादाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मूळजी जेठा शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथील प्राचार्य तथा प्र अधिष्‍ठाता डॉ अशोक राणे होते. 

याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून प्राचार्य डॉक्टर मीना कुटे यांनी गुरू-शिष्य संबंध शिक्षणाच्या कणा या विषयावर आपले मत मांडले. गुरु विना शिक्षण आपल्याला मिळू शकत नाही म्हणून शिक्षकी पेशा हा वसा आहे. खऱ्या अर्थाने 1000 कुंभमेळा चं फळ प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक शिक्षक होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉ मीना कुटे यांनी केले. निजामपूर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए पी खैरनार यांनी गुरू-शिष्य संबंध व्यक्ती जीवनाची समृद्धी या विषयावर मत व्यक्त करताना गुरु शिष्यांमध्ये जिव्हाळा प्रेम अंतर्भाव असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी चारित्र्यवान गुरूंची आवश्यकता समाजाला असल्याची खंत या प्रसंगी मांडण्यात आली.बालकांना खऱ्या अर्थाने स्वतंत्र विचाराची पिढी निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ लता मोरे यांनी केले यात त्यांनी सर्व गुरूंना आदरांजली वाहण्याचा उत्सव असल्याचे मत याप्रसंगी मांडले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ अशोक राणे यांनी आदर्शवत शिक्षण प्रणाली यावर चिकित्सक मंथन केले. त्याचप्रमाणे सध्या परिस्थिती मध्ये असणारे शिक्षण पद्धतीतील बदल यावर ही चर्चा केली.

या कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय डॉक्टर मंदा मोरे यांनी तर स्वागत गीत कुशलकुमार माळी यांनी सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ नितीनकुमार माळी यांनी तर आभार डॉ. संजय अहिरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विसरवाडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए टी पाटील यांनी विशेष उपस्थिती दिली.सदर कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी तसेच प्राचार्य यांनी उपस्थिती दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री सुरुपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!