सातारा - जिल्ह्यात मागच्या दोन तीन दिवसात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे वीज... अनेक ठिकाणी तारा तुटणे, पोल वाहून जाणे अशा घटना घडल्या आहेत. हे सर्व पूर्ववत करण्यासाठी जिवाची पर्वा न करता विद्युत विभागाचे कर्मचारी काम करत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कौतुक केलं आहे.
चौदा गावांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी
वेन्ना नदीला महापुर आल्या मुळे उच्चदाब वाहिनी चे बारा पोल वाहून गेली त्यामुळे चौदा गावांचा(केळकर,डांगरेघर,पुनवाडी, धावली इ) वीजपुरवठा खंडित झाला आहे.वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाऊस आणि चिखलाची परवा न करता कर्मचारी यांनी खांद्यावरून पोल वाहून अंधारात असलेल्या गावांच्या प्रकाशासाठी... हा रस्ता तुडवला.
200 वीज जोडण्याकेल्या पूर्ववत...!!
पाटण शहरातील ब्राह्मणपुरा भागातील जवळपास 200 वीज कनेक्शन बंद होती, शहराच्या पूर्वेकडून केरा नदी वाहते, या अतिवृष्टीमुळे नदीला पुर आला असतानाही वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जिवाची पर्वा न करता कर्मचारी यांनी शर्थीचे प्रयत्न करून वीजपुरवठा सुरळीत केला.जिल्हाधिकारी शेखर सिंह, विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी या सर्वांच्या कामाचे कौतुक केले.