भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दि २५/०७/२०२१ रोजी बहुजन मुक्ती पार्टी ची भुसावळ तालुका कार्यकरणी गठित करण्यासाठी दिपनगर भुसावळ येथे मा.डॉ राहुल तायडे यांच्या निवासस्थानी बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी बैठकीत भुसावळ शहरातील तसेच तालुक्यातील गावातून खूप मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते उपस्थित होते ह्या वेळी सर्व युवा कार्यकर्त्यांनी बहुजन मुक्ती पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी मा.डॉ राहुल तायडे यांची बहुजन मुक्ती पार्टी च्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच त्यांचं नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले यावेळी भुसावळ तालुक्यात बहुजन मुक्ती पार्टी च्या कसा वाढविस्तार होईल ह्या वर चर्चा करण्यात आली व सर्व पदाधिकार्यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी मा.हारून मंसुरी (राज्यसद्यस्य बहुजन मुक्ती पार्टी) याबैठकीचे अध्यक्षस्थानी होते.
या बैठकीत मा.अमजद रंगरेझ(जिल्हाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी), मा.विजय सुरवाडे(जिल्हामहासचिव बहुजन मुक्ती पार्टी), मा.अजय इंगळे(विद्यमान सरपंच मन्यारखेडे) इरफान शेख (महानगराध्यक्ष जळगाव), मा.राहुल सोनवणे (भारत मुक्ती मोर्चा) विजय साळवे(RMBKS). मा.अरुण म्हस्के (RMBKS) यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच भुसावळ तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीचे प्रास्ताविक मा.अजय इंगळे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.राहुल सोनवणे व आभार मा.डॉ राहुल तायडे यांनी केले.