" सांगलीतील प्राणीमित्र अ‍ॅड बसवराज होसगौडर यांच्या तक्रारीवरून साप मारून सोशल मीडियावर वायरल करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई "

अनामित

लातूर : सांगलीतील प्राणीमित्र अ‍ॅड बसवराज होसगौडर यांच्या तक्रारीवरून लातूर जिल्ह्यातील उदगीर गावातील संशयित वैभव बुदरे यांच्या विरुद्ध साप मारून सोशल मीडियावर वायरल केल्याप्रकरणी लातूर वन विभागकडून कारवाई करण्यात आली आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, उदगीर गावातील संशयित वैभव बुदरे हे धामण जातीचा साप मारून सोशल मीडियावर पोस्ट केली. 

सदरची पोस्ट वायरल झाली. या पोस्टची माहिती प्राणीमित्र अ‍ॅड बसवराज होसगौडर यांना मिळाला. संशयित व्यक्तीचा आपल्या सहकारी प्राणिमित्रांकडून शोध घेऊन उदगीर येथील वन विभागाचे वनपाल, टी. बी. वंजे यांना संपर्क करून सदर वन्य गुन्हा बद्दल माहिती देऊन तक्रार केले. 
तक्रारीचे त्वरित दखल घेऊन आपल्या सहकार्यासह संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई केल्याचे वनपाल, टी. बी. वंजे यांनी सांगितले. या कारवाई मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी ऐ. आर. सांगुळे यांनी सहकार्य केले. कोणतेही साप मारणं कायद्याने गुन्हा असून वन्यजीव स्वरंक्षण अधिनियम 1972 अन्व्ये 3 ते 7 वर्ष पर्यंत शिक्षा असून 10,000 ते 25,000 पर्यंत दंड असल्याचे अ‍ॅड बसवराज होसगौडर यांनी सांगितले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!