रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे)आज दिनांक 21/ 7/ 2019 रोजी श्री दिनकर नामदेव महाले वय 64 वर्ष व्यवसाय सलूनचा व्यवसाय, नाभिक समाजातील सलून व्यवसाय करणारे डॉ नरेंद्र दिनकर महाले, सरस्वती विद्या मंदिर,यावल यांचे वडील.शासकीय नोकरीत असणारे सर्व कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे कार्यक्रम होत असतात परंतु खासगी क्षेत्रात असणाऱ्यांच्या सेवानिवृत्ती चा कार्यक्रम व त्यातल्या त्यात नाभिक समाजात आयुष्यभर सलून चा व्यवसाय करणारे श्री दिनकर नामदेव महाले यांचा सेवानिवृत्ती चा कार्यक्रम चाळीस वर्ष भुसावळ सारख्या शहरात सलून चा व्यवसाय करत,
आज वयोमानानुसार थकल्यामुळे त्यांची सेवानिवृत्ती करण्यात आली. ही सेवा निवृत्ती एक आगळा वेगळा उपक्रम या महाले कुटुंबियांनी याठिकाणी राबविला. आपल्या आयुष्यात निर्व्यसनी व प्रामाणिक पूर्ण जीवन जगणारे नरेंद्र महाले सर यांचे वडील यांनी आपल्या तीन मुलांना उच्चशिक्षित केले व त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांना एक उत्तम नागरिक घडवले. आज त्यांच्या मुलांकडून आपल्या वडिलांसाठी कर्तव्यपूर्ती शुभारंभ सोहळा ,भुसावळ याठिकाणी संपन्न झाला.
सदर कार्यक्रमास अध्यक्ष व्यास प्रसाद एज्युकेशन सोसायटी रमाकांत दादा देशपांडे ,मुख्याध्यापक जी डी कुलकर्णी ,अखिल भारतीय जीवा सेना जिल्हाध्यक्ष देविदासभाऊ फुलपगारे, जिल्हा कर्मचारी संघटना अध्यक्ष अनिल जगताप सर ,यशवंत पाटील, बी एल पाटील ,नाभिक समाजातील सलून व्यवसायिक,नाभिक समाजातील मान्यवर,शिक्षक वर्ग, या कार्यक्रमासाठी प्रतिनिधीक स्वरूपात उपस्थित होते.समाजात या आदर्श उपक्रमाचे सर्वांकडून खूप कौतुक होत आहे.