यावल वार्ताहर (सुरेश पाटील)शिरवेल महादेवावर जाणाऱ्या यावल येथील भाविकांच्या मोटरसायकलचा फैजपूर जवळ जे.टी.महाजन इंजिनीरिंग कॉलेज समोर ट्रक व मोटरसायकल अपघातात मोटरसायकल वरील तीनही जण जबर जखमी झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी आठ वाजता घडली,फैजपुर येथील खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार करून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तिघ जणांना पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
[ads id='ads1]
यावल येथील श्रीराम नगर मधील जयेश सुरवाडे वय 20 ,वासू गैची वय 18, हर्षल घारू वय 19 हे तिघे आज श्रावण सोमवार निमित्ताने यावल येथून मध्यप्रदेशातील प्रसिद्ध शिरवेल महादेव देवस्थानावर मोटरसायकल क्र.एम.एच.19-बी.वाय.4273 वरून दर्शनासाठी जात असताना फैजपूर जवळील जे.टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेज समोर फैजपूर कडून यावलकडे जाणाऱ्या ट्रकची (क्र.जे.के.03-सी-6690) जोरदार धडक लागल्याने तिघेजण मोटरसायकलवरून रोडवर फेकले गेल्याने तसेच मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या अपघातात तिघे जण जबर जखमी झाले जखमीवर उपस्थितांनी फैजपूर येथील खाजगी रुग्णालयात तात्काळ प्रथमोपचार करून जळगाव येथे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी दाखल केले या अपघातामुळे फैजपूर व यावल शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
