विवरे ता. रावेर ( समाधान गाढे ) बऱ्हाणपुर - अंकलेश्वर महामार्गावरील रावेर - सावदा दरम्यान वडगाव गावा जवळ सावदा येथुन विवरे येथे घरी येतांना मोटारसायकल ला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर एक जखमी झाल्याची घटना आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की विवरे येथिल Meeter Reding मिटर रेडींगचे काम करणारा अनिल वाघोदे अंदाजे वय ४२ हे त्यांचा खाजगी काम आटोपुन व सोबत एक असे दोन जण सावदा येथुन मोटरसायकलने ( MH19 BZ 9867 ) विवरे येथे घरी परत येतांना वडगाव गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांची मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने अनिल वाघोदे यांचा जागीच मुत्यु झाला. तर दुसरा जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली, याबाबत निंभोरा पोलीसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मयत अनिल वाघोदे यांच्यावर रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांचा पश्चात आई वडील दोन मुली एक मुलगा भाऊ बहीण असा परिवार आहे.


