जिल्ह्यात पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न ; 303 केंद्रावर 24 हजार 380 विद्यार्थ्यांचा सहभाग

अनामित
नांदेड (वार्ताहर) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 12 ऑगस्टला जिल्ह्यात संपन्न झाली. यात 24 हजार 380 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. 

राज्यस्तरावरील निर्देशानुसार ही शिष्यवृत्ती परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी व्यवस्थित नियोजन प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर आणि माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी केले होते.
 [ads id='ads1]
जिल्ह्यातील 303 केंद्रावर ही परीक्षा पार पडली. इयत्ता पाचवीचे 15 हजार 182 विद्यार्थी तर इयत्ता आठवीचे 9 हजार 198 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. एकूण 24 हजसा 380 विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दिली.

पूर्व उच्च प्राथमिकचे विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण 90.11 टक्के तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीचे विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण 88.7 टक्के होते. कोविडीच्या संदर्भातील सर्व नियमावलीचे पालन करून ही परीक्षा आज संपन्न झाली. कोविड-19 च्या परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या अनेक शिक्षकांनी ऑनलाईन क्लासद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत मार्गदर्शन केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!