जे टी महाजन यांच्या जयंती निमित्त न्हावी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

अनामित
न्हावी वार्ताहर (किरण तायडे) तालुका यावल येथील न्हावी ग्रामपंचायतने 14 व्या वित्त आयोगातून मुख्यमंत्री पेयजल यावजनेचे व व्यापारी गाळ्यांचे उदघाटन व फलक अनावरण जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील ,माजी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले, ग्रामपंचायतींची प्रसतावना लोकनियुक्त सरपंच भारती चौधरी यांनी केले, मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा व स्व,जे टी महाजन यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण केल्या व दीप प्रज्वलन केले
[ads id='ads1]
जर विकासाची गोष्ट डोक्यामध्ये ठेवली तर गावचा विकास शक्य असून सगळ्यांनी एकत्र येऊन विशेष गावच्या राजकारणात आजी-माजी सदस्य व सरपंच व उपसरपंच यांनी एकत्र येऊन सर्वांच्या सहकार्याने मुख्यमंत्री पेजल योजना अमलात आणली तसेच 14 व्या वित्त आयोग अंतर्गत व्यापारी गाळे बांधकाम सुद्धा पूर्ण केले असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी केले
     
ते नावे ग्रामपंचायत आयोजित मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना व 14 वित्त आयोग अंतर्गत व्यापारी गाणे बांधकाम उद्घाटनाच्या व्यासपीठावरून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जीव अध्यक्ष जळगाव रंजना पाटील ,आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे माजी आमदार अरुण पाटील मसा का चेअरमन शरद महाजन व्हाईस चेअरमन भागवत पाटील जि प सदस्य प्रभाकर सोनवणे सभापती पल्लवी चौधरी यावल कृउबा सभापती तुषार पाटील खरेदी-विक्री संघाचे सभापती सुनील फिरके कृषीभूषण नारायण चौधरी माजी शिक्षण सभापती हर्षल पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरा चौधरी सदस्य सरफराज तडवी पी एम एस सोसायटीचे उपाध्यक्ष उल्हास चौधरी प्रांताधिकारी कैलास कडलक उपस्थित होते.
       
अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार गिरीश महाजन म्हणाले स्पर्धा कशी करायची तर विकासाची स्पर्धा असावी विकासासाठी सर्व एकत्र आले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही विकास करताना राजकारण विरहित विकास पाहिजे प्रत्येकाने श्रेय वादाच्या भानगडीत पडू नये त्याचप्रमाणे या परिसरातील शेतकरी आणि कर्मचारी यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मधुकर सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी सर्वांनी राजकारणाचे जोडे बाहेर काढून एकत्रित आले तर कारखाना सुरू होऊ शकतो यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे

आमदार संजय सावकारे आमदार राजूमामा भोळे माजी आमदार अरुण पाटील यांनी आपले मनोगतातून ग्रामपंचायतीच्या कार्याचा कार्याचे कौतुक केले
चौकट ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून तर आतापर्यंत सर्व हयात माजी सरपंच उपसरपंच यांचा सत्कार विद्यमान ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजगड डॉक्टर केजी पाटील यांनी केले 

तर आभार उपसरपंच मंडळ यांनी मानले प्रास्ताविक सरपंच भारती चौधरी यांनी केले मनोगतातून शरद महाजन यांनी कार्यक्रमा विषयी सविस्तर माहिती दिली शरद महाजन म्हणाले टाटा यांनी जे सेवेचं व्रत अंगिकारलं होतं तेच मी पुढे सुरू ठेवत आहे शरद महाजन म्हणाले शासनाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य ग्रामपंचायत प्रशासन करीत असते आणि ग्रामस्थांकडून त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असतो मतभेद बाजूला ठेवून विकासाच्या गंगेमध्ये सगळेच एकत्रितपणे काम करीत आहेत

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!