यावल वार्ताहर (सुरेश पाटील) यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात सतत दोन महिन्यापासुन पावसाने दांडी मारल्याने पिकाची खुप दयनीय पारिस्थीती निर्माण झाली आहे उन्हामुळे उभी पिके करपत असुन पिके कोलमडून पडत आहे पिकांची पाने उन्हामुळे वातीसारखी झाली आहे
[ads id='ads1]
त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल तर झालाच आहे पण शेतीवर आधारीत असणारे सर्वसामान्य मजुरवर्ग तसेच सर्व उद्योग व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे या अगोदर कोरोना महामारीमुळे कडक निर्बधात सर्व उद्योग व्यावसाय ठप्प झाले शेतकरी वर्गासह हात मजुरीवर पोट भरणाऱ्याचे अतोनात नुकसान होणार आहे
त्यात तर काही जिल्हात महापुराने थैमान घालुन अनेकाचे संसार उध्वस्त झाले आहे कित्येक जणाचे बळी गेले आहे त्यात पुन्हा अजुन हे दुष्काळाचे नवीन संकट उभे राहीले आहे वेळेवर पाऊस न पडल्यामुळे शेतीमाल उत्पादनावर मोठा विपरीत परिणाम होणार आहे महाविकास आधाडीच सरकार राज्यात असुन देखील याबाबत लक्ष देण्यास तयार नाही विद्यमान लोकप्रतिनिधीना देखील याबाबत विधानसभेत आपआपल्या तालुक्यातील दयनीय परिस्थीसीचा आढावा मांडण्याचा विसर पडला की काय?असाही प्रश्न अरुण पाटील यांनी उपस्थित केला आहे,
राज्यात मागे भाजपाचे सरकार सत्तेवर होते त्यावेळी हीच कॉग्रेस/राष्ट्रवादी कॉग्रेस/ शिवसेना मंडळी सरकारला धारेवर धरायची मग आता तर याचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असुन देखील शेतकरी/शेतमजुर/सर्वसामान्य मडळी/उद्योग व्यावसाय करणारे मंडळी यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी गप्प का ? राज्यासह जिल्हाभरात दुष्काळाची भयावह परिस्थिती समोर दिसत असल्यामुळे शेतकरी वर्गसुद्धा म्हणतो दुष्काळ जाहीर करायला पाहिजे त्यामुळे शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा,दुष्काळ जाहीर करताना नेमका चोपडा/यावल/रावेर तालुकेच का ?वगळले जातात असेही प्रश्नचिन्ह निर्माण होतात म्हणुन वेळीच उपाययोजना म्हणुन संपूर्ण जळगांव जिल्ह्यात दुष्काळ त्वरीत जाहीर करावा अशी मागणी भाजपा दिव्याग आधाडीचे माजी जिल्हा अध्यक्ष अरुण शामराव पाटील यांनी एका पत्रकान्वये केली आहे.