नागपूर वनविभागाची धाडसी कार्यवाही ; वाघाच्या दातासह 5 आरोपींना अटक , न्यायालयाने चारही आरोपींना दि.03/09/2021 पर्यंत वन कोठडी मंजुर केली

अनामित
नागपूर - वनविभागाच्या चमुव्दारे दिनांक 27/08/2021 रोजी नागपूर-चंद्रपूर हायवे क्र.7 अपना पंजाब ढाबा जवळ वाघाच्या अवयवांची विक्री होणार असल्याचे गुप्त माहिती मिळताच सापळा रचून आरोपी नामे 1) विजय हरीभाउ वाघ, वय 33 वर्षे, रा.बुटिबोरी, 2) परसराम नंदु बिजवे, वय 36 वर्षे, रा.तास 3) गणेश देवीदास रामटेके, वय 28 वर्षे, रा.बोर्डकला या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. उक्त कार्यवाही दरम्यान आरोपींची झडती घेतली असता, आरोपींकडून वाघाचे दात(दंत) हस्तगत करण्यात आले. 
[ads id='ads1]
तसेच वनगुन्ह्यात वापरण्यात आलेली हिरोहोन्डा कंपनीची (Hero Passion Pro) मोटारसायकल क्र.MH-40-AD-9152 जप्त करण्यात आली. प्रस्तुत प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम,1972 चे विविध कलमान्वये वनगुन्हा क्र. 04922/123028 दि.27/08/2021 नोंदविण्यात आला आहे. 

 तसेच प्रस्तुत प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची सखोल चौकशी केली असता, आणखी दोन आरोपी सदर गुन्हात सहभागी असल्याचे निदर्शनास आले. त्याअनुषंगाने दिनांक 28/08/2021 रोजी सकाळी 09.00 वाजेच्या सुमारास दोन पैकी एक आरोपी नामे दिक्षानंद दिलीप राउत, रा. मसाळा ता.चिमुर याला अटक करण्यात आले असून दुसरा आरोपी फरार आहे. 
 उक्त प्रकरणात अधिक चौकशी होण्याच्या दृष्टीने नागपूर वनविभागाव्दारे मा. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, नागपूर ग्रामिण यांचे न्यायालयात ताब्यातील आरोपींना हजर केले असता, मा. न्यायालयाने चारही आरोपींना दि.03/09/2021 पर्यंत वन कोठडी मंजुर केली आहे.

 उपरोक्त कार्यवाही ही नागपूर वनविभागाव्दारे डॉ. भारत सिंह हाडा, उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख श्री. एन. जी. चांदेवार, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास-2), उमरेड, श्री. एल. व्ही.ठोकळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, बुटिबोरी, तसेच बुटिबोरी वनपरिक्षेत्रातील वनपाल श्री.केकान आणि वनरक्षक कु.नागरगोजे श्री. मुंडे, श्री.टवले, व इतर वनकर्मचारी श्री.शेंडे, श्री.चव्हाण यांचे पथकाव्दारे सदर कार्यवाही करण्यात आली आहे. सदर वनगुन्ह्यात पुढील तपास श्री. एन. जी. चांदेवार, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास-2), उमरेड यांच्या मागदर्शनाखाली सुरू आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!