रावेर तालुक्यातील विवरे बु येथे ग्रामसभा तहकूब

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

समाधान गाढे (प्रतिनिधी)  रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक येथे30/08/2021 सोमवार रोजी  ग्रामसभा घेण्यात आली होती ग्रामस्थांन मध्ये ग्रामसभेची उत्सुकता वाढली होती गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भाव आढळून येत होता म्हणून गावात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले नव्हते परंतु सोमवार रोजी ग्रामसभा घेण्यात आली ग्राम सभेत खालील विषयांवर चर्चा करण्यात येणार होती ,, मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे, वार्षिक अहवालास मंजुरी देणे,ग्राम आरोग्य व पाणी पुरवठा स्वच्छता समिती ,ग्राम कृषी संजीवनी समिती गठण करणे ,ग्राम स्तरीय दक्षता समिती  ,महात्मा गांधी तंटामुक्त समिती स्थापन करणे, कोरोना मुक्त गाव योजेनेत भाग घेणे,जैविक विविधता समस्या समितीचे गठण करणे पंधराव्या वित्तायोगत कामांची तरतूद करणे,तसेच पंधरावा वित्त आयोग        कृती आराखडा तयार करणे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कृती आराखडा मंजूरी देणे,व अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या विषयांवर चर्चा करणे ग्रामसभेच्या सुरवातीला सरपंच यांनी शांतता राखण्याचे आव्हान केले पाऊसाने सुद्धा ग्रामसभेला हजेरी लावली भर पाऊसात ग्रामस्थ आपल्या समस्या मांडण्या करिता  पावसात भिजत उभे होते मात्र ग्रामपंचायती कडून ग्रामसभेला ग्रामस्थांना बसण्यासाठी कोणतेही व्यवस्था केलेली नसताना ग्रामस्तान मधून नाराजगी चे सूर निघत होते तंटामुक्ती समिती गठण करणे या विषयांवर चर्चा सुरू असताना तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदावरून ग्रामसभेत किरकोळ वाद झाला तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी प्रमोद संनसे व प्रशांत माळी यांनी विवरे बुद्रुक गावचे शिवसेना शाखा प्रमुख पिंटू माळी यांचे नाव सुचविले त्या नंतर भागवत माळी यांनी शेख इस्माईल यांचे नाव सुचविले नंतर राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ता चेतन पाटील यांचे सुद्धा ग्रामस्थांनी नाव सुचविले असता तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी वाद सुरू झाल्या नंतर सरपंच ग्रामसेवक यांनी सभेतून पळ काढत ग्रामस्थांच्या समस्या व प्रश्न न ऐकता सरपंच ग्रामसेवक व उपसरपंच यांनी सभेतून काढता पाय घेतला असे होत असले तर ग्रामस्थांच्या समस्यांचे निवारण कोण करील? व गावाच्या विकासाचे काय होईल? आधीच गाव समस्येने त्रस्त आहे तर गावाचे काय ? असे अनेक प्रश्न ग्रामस्थांमध्ये उपस्थित झाले असल्याचे निदर्शनास आले यांची होती उपस्थिती सरपंच युनूस तडवी,ग्रामसेवक अरविंद कोलते, ,उपसरपंच भाग्यश्री पाटील , माजी . ग्राम . पं .स .नीलिमा संनसे ,पुनम बोंडे,ललिता पाचपांडे , नवशाद बी, ग्रामपंचायत सदस्य विपिन  राणे,युसुफ खाटीक,दिपक राणे,विनोद मोरे,शिवाजी पाटील ,वासू नरवाडे . व समस्यांनी ग्रस्त असलेल्या ग्रामस्थांची उपस्थिती होती.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!