२०२१ "द रिअल सुपर वूमन अवॉर्ड" च्या राष्ट्रीय पुरस्काराने अमळनेर येथील प्रा.जयश्री दाभाडे यांना केले सन्मानित..

अनामित
अमळनेर प्रतिनिधी (सुशिल कुवर) अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या ठोस प्रहार च्या संपादक प्रा. जयश्री दाभाडे यांना राजस्थान जयपूर येथील फॉरेव्हर स्टार इंडिया अवॉर्ड ह्या संस्थेने 'द रिअल सुपर वुमन अवॉर्ड' २०२१ (The Real Super Woman Award 2021) हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. या संदर्भात FSIA या संस्थेने प्रा. जयश्री दाभाडे यांचे नॉमिनेशन मागविले होते. देशभरातील खऱ्या अर्थाने तळा गाळातील समाज घटकांसाठी कार्य करत असलेल्या महिलांचा सन्मान या संस्थे मार्फत केला जातो.
[ads id='ads1]
प्रा. दाभाडे ह्या सातत्याने वंचित, दलित, आदिवासी, महिला, बालक यांच्या साठी उत्कृष्ट कार्य करत आहेत. त्याच बरोबर पत्रकारिता क्षेत्रात अत्यंत कमी वेळात आपल्या लेखणीच्या माध्यमातून ठसा उमटवला आहे. अनेक आंदोलने, उपोषण, अर्ज निवेदने या मार्फत समाजातील अति सामान्य माणसाच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी प्रशासनाकडून न्याय मिळविला आहे. वेळ प्रसंगी समाजासाठी तुरुंगवास पत्करण्याची देखील त्यांनी तयारी दाखवली आहे. प्रत्यक्ष फिल्ड वर उतरून कार्य करणाऱ्या प्रा. दाभाडे यांनी गेल्या 26 वर्षांपासून निस्वार्थीपणे आपले कार्य सुरू ठेवले आहे.
प्रा. जयश्री दाभाडे यांनी आपला बहुमूल्य वेळ, पैसा, बुद्धिमत्ता ही सर्वसपणे आपल्या समाज, वंचित घटकांसाठी दिला आहे. या त्यांच्या सर्व कार्याची दखल आता पर्यंत अनेक अशासकीय, शासकीय पातळीवर घेण्यात आली असून त्यांनी आजपर्यंत ५५ पुरस्कार प्राप्त केले आहेत. आता हा त्यांना ५६ वा मानाचा तुरा त्यांच्या शिरपेचात राष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन "द सुपर वूमन अवॉर्ड" ने सन्मानित करण्यात आले आहे.
FSIA ही संस्था जयपूर राजस्थान येथून आपले कार्य चालविते. ह्या संस्थेचे मिस इंडिया, मिसेस इंडिया, सुपर हिरो, सुपर वूमन आणि फॉरेवर स्टार अवॉर्ड अश्या वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व सौंदर्य स्पर्धा या संस्थेमार्फत आयोजित करण्यात येतात. गर्भवती महिलांसाठी देखील "द ब्युटी अँड प्रेग्नंट वूमन अवॉर्ड" ही स्पर्धा यामार्फत आयोजित करण्यात येते. देशभरातील सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांचे ऑनलाइन प्रोफाइल बनविले जाते. फॉरेवर स्टार इंडिया अवॉर्ड च्या वेबसाईटवर जगातील सर्व व्यक्तीच्या प्रोफाईल प्रत्येक व्यक्ती पाहू शकतो. सर्व कार्य ह्या प्रोफाइल वर अपलोड केले जाते.

 आणि स्क्रूटिनी समिती मार्फत सर्व माहिती तपासून पाहिल्यानंतर आलेल्या नॉमिनेशन मधून वर्गीकरण करून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा कार्यक्रम सोहळा आयोजित करून त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान केला जातो. कोरोना काळ असल्यामुळे या वर्षी पुरस्कार सोहळा आयोजित केला गेला नाही म्हणून हे सन्मान प्रमाणपत्र पाठवून देऊन त्यांचा सन्मान केला जात आहे.
प्रा. जयश्री दाभाडे यांना मिळालेल्या ह्या राष्ट्रीय पुरस्काराने निश्चितच अमळनेर करांची देखील मान उंचावली असून अमळनेर चे नाव राष्ट्रीय व जागतिक पातळीवर गेले आहे. प्रा. दाभाडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून राजकीय,सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!