जगातील पहिली COVID -19 DNA लस विकसित ; DBT-BIRAC च्या मदतीने झायडस कॅडिलाने विकसित केलेल्या ZyCoV-D लसीला मिळाली आपत्कालीन वापराची मान्यता..

अनामित
मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत DBT-BIRAC च्या भागीदारीने जगातील पहिली कोविड -19 DNA लस विकसित

नवी दिल्ली : झायडस कॅडिलाला ZyCoV-D साठी  म्हणजेच 20/08/2021 रोजी भारतीय औषध महानियंत्रकाकडून  (DCGI) कडून आपत्कालीन वापराला मान्यता  मिळाली आहे.  ही जगातील पहिली आणि भारताची स्वदेशी विकसित कोविड -19 साठी डीएनए आधारित लस 12 वर्षे आणि त्यावरील मुले आणि प्रौढांना दिली जाणार आहे. 'मिशन कोविड सुरक्षा' अंतर्गत केंद्र सरकारच्या  जैव तंत्रज्ञान विभागाच्या भागीदारीने विकसित आणि BIRAC द्वारे कार्यान्वित, ZyCoV-D ला राष्ट्रीय बायोफार्मा मिशन फॉर प्रीक्लिनिकल स्टडीजच्या माध्यमातून कोविड -19 रिसर्च कन्सोर्टिया अंतर्गत ,पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी तर  मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला समर्थन मिळाले आहे.
[ads id='ads1]
 ही 3 मात्रांची  लस जेव्हा  दिली जाते तेव्हा सार्स -सीओव्ही -2 विषाणूचे स्पाइक प्रथिने तयार करते आणि रोगप्रतिकारक शक्ती  निर्माण करते, जी रोगापासून संरक्षण देण्यात  महत्वाची भूमिका बजावते. प्लास्मिड डीएनए प्लॅटफॉर्म प्लग-अँड-प्ले तंत्रज्ञानावर आधारित आहे जे विषाणूच्या उत्परिवर्तनांना सामोरे जाण्यासाठी मदत करू  शकते.

तिसऱ्या टप्प्यातील  क्लिनिकल चाचण्यांच्या अंतरिम निष्कर्षात 28,000 पेक्षा जास्त स्वयंसेवकांपैकी  लक्षणे असलेल्या आरटी-पीसीआर बाधित रुग्णांमध्ये 66.6 टक्के प्रभावी असल्याचे आढळले आहे. कोविड -19. साठी भारतातली  ही आतापर्यंतची सर्वात मोठी लस चाचणी आहे. या लसीने याआधी केलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील  क्लिनिकल चाचण्यांमध्ये मजबूत प्रतिकारशक्ती  आणि सहनशीलता आणि सुरक्षा दाखवली आहे. तिन्ही क्लिनिकल चाचण्यांचे स्वतंत्र डेटा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्ड (DSMB) द्वारे निरीक्षण केले  आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!