सेवा हेच संघटन तत्व समजून रुग्णसेवा करणाऱ्या सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा व सर्व वैद्यकीय आघाडी सभासदांचा अभिमान वाटतो - आमदार राजू भोळे

अनामित
यावल वार्ताहर (सुरेश पाटील)कोरोना महामारीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्याच काम हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी माजी जलसंपदा मंत्री तथा आ.गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली केल आहे, सेवा हेच संघटन हे तत्व अवलंबून रुग्णसेवा करणाऱ्या सर्व भाजपा कार्यकर्त्यांचा व सर्व वैद्यकीय आघाडीच्या सभासदांचा मला अभिमान वाटतो असे गौरव उद्गार भाजपा जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूभोळे यांनी काढले. 
    [ads id='ads1]      
दोन दिवसापूर्वी राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियानाची जळगाव जिल्हा कार्यशाळा जळगाव ब्राह्मण सभागृह येथे आयोजित करण्यात आले होती.या कार्यशाळेमध्ये उदघाटनाप्रसंगी आमदार सुरेश राजूमामा भोळे बोलत होते.या कार्यशाळेत करोना प्रतिबंध व उपचार, लसीकरण, लक्षणे व आजार,कोरोनाची तिसरी लाट आदी विषयांवर डॉ.नरेंद्र ठाकूर, डॉ.कुंदन फेगडे,डॉ,दर्शन शहा, डॉ.धर्मेंद्र पाटील,डॉ.नि.तू.पाटील, डॉ.लीना पाटील आदी तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.यावेळी मंचावर भाजप जिल्हाध्यक्ष आमदार राजू भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी,प्रदेश उपाध्यक्ष माजी आ.स्मिता वाघ,महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेविका उज्वला बेंडाळे,वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नि.तू.पाटील, माजी जि.प.अध्यक्ष प्रयागताई कोळी,वैद्यकीय आघाडीचे ग्रामीण संयोजक डॉ.नरेंद्र ठाकूर,वैद्यकीय आघाडीचे महानगर संयोजक डॉ. धर्मेंद्र पाटील,जिल्हा सरचिटणीस सचिन पाटील,महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी,डॉ. राधेश्याम चौधरी, नितीन इंगळे, महेश जोशी,महानगर कार्यालय मंत्री प्रकाश पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे आमदार सुरेश राजू भोळे म्हणाले कि, कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच रस्त्यावर उतरून रुग्णांची सेवा करण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, वैद्यकीय आघाडी सभासदांनी केले असून रुग्णांना हॉस्पिटलला पोहचवणे,जेवणाची व्यवस्था करणे,अंत्यविधी साठी सहकार्य करणे असे विविध आघाडीवर काम केले आहे व आगामी काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी भाजपा वैद्यकीय आघाडीचा कार्यकर्ता तत्पर राहील असेही त्यांनी नमूद केले.

तसेच महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी व प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ यांनी मार्गदर्शन केले व अध्यक्ष मनोगत आमदार राजू भोळे यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव महानगर आयटीसेल संयोजक अमित सोळुंके यांनी केले व आभार जळगाव ग्रामीण आयटीसेल संयोजक तथा कार्यालय मंत्री गणेश माळी यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!