७५ व्या अमृत महोत्सवी वर्ष, स्वातंत्र्य दिना निमित्त सर्व शक्ती सेना , महाराष्ट्र राज्याच्या वतीने विविध कार्यक्रम, संपन्न.

अनामित
भुसावल वार्ताहर (प्रमोद कोंडे) ७५ व्या अमृत महोत्सवी वर्ष, स्वातंत्र दिना निमित्त सर्व शक्ती सेना, कार्यालयामध्ये, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ,नागरिक मधुकर भगवान मोरे सेवानिवृत्त रेल्वे ,अधिकारी हे होते.प्रथम भारत मातेच्या प्रतिमेचे प्रा. संजय मोरे सर्व शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष तथा, राष्ट्रीय मानव अधिकार, महाराष्ट्र राज्य, उपाध्यक्ष आणि प्रमुख अतिथी यांच्या हस्ते पुष्पहार, अर्पण करून पुजन करण्यात आले. ७५ नागरिकांना छोटे तिरंगा ध्वज (झेडे) प्रा. संजय मोरे  यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.त्याच प्रमाणे, ७५ व्या अमृत महोत्सवी, वर्षा निमित्त जळगाव जिल्ह्यामध्ये, भारताचे स्वातंत्र्य अमृत महोत्सवी, वर्ष या विषयावर ७५ विद्यार्थी , विद्यार्थिनी, साठी ऑन लाईन निबंध स्पर्धेचे, आयोजन करण्यात आले होते.त्या मध्ये, जळगाव जिल्ह्यातून ,७५ विद्यार्थी, विद्यार्थिनी, यांनी सहभाग घेतला. प्रथम, द्वीतीय, तृतीय अशा ३ विद्यार्थ्यांना प्रमाण पत्र आणि रोख स्वरूपात बक्षित देण्यात येणार असुन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
[ads id='ads1]
या नंतर प्रा. संजय मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त, करतांना सांगितले की,१५ऑगस्ट १९४७ हा दिवस भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे.कारण या दिवशी भारतातील लोकांना ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून, स्वातंत्र्य ,मिळाले.भारत देशातील राष्ट्रपिता महात्मा गांधी,पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, स्वातंत्र विर सावरकर , लोकमान्य टिळक , महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर, लाल बहादुर शास्त्री, शहीद चंद्रशेखर आझाद , शहीद भगत सिंग,राजगुरू, सुखदेव, देशातील अनेक स्वातंत्रविर, शुर पुत्रांनी, आपला जीव धोक्यात घालून केवळ देशाला स्वतंत्र, केले. एक प्रदीर्घ ,संघर्षानंतर देश स्वतंत्र ,झाला.आणि हे स्वातंत्र दरवर्षी, १५ ऑगस्ट रोजी, मोठ्या थाटामाटात साजरे केले जाते.या वर्षी , आपण अमृत महोत्सवी, वर्ष साजरे करत आहेत. संपुर्ण भारत देशामध्ये, विविध कार्यक्रम नी साजरा करण्यात आला.भारत देशच नव्हेतर , बहरीन, ब्रिटिशांच्या गुलामगिरीत कैद झाला,आणि १५ऑगस्ट १९७१ रोजी, या देशाला स्वातंत्र्य मिळाले.कांगो या देशाने १५ऑगस्ट १९६० रोजी, फ्रांस पासुन स्वातंत्र्य मिळाले. लिकटेस्टाईन या देशाला जर्मनी पासुन १५ ऑगस्ट १९४० स्वातंत्र्य मिळाले. 

दक्षिण कोरिया या देशाला १५ऑगस्ट १९४५ रोजी, जपान पासुन स्वातंत्र्य मिळाले.उत्तरं कोरिया या देशाला १५ऑगस्ट १९४५ रोजी,जपान पासुन स्वातंत्र्य मिळाले.अशा प्रकारे भारत देशासह या देशांना सुध्दा १५ ऑगस्ट रोजी, स्वातंत्र्य मिळाले.असे प्रा, संजय मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक मधुकर भगवान मोरे, प्रा. संजय मोरे सर्व शक्ती सेना,महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष, प्रा. हर्षवर्धन भालेराव, प्रा. सुनील तायडे, प्रा .अशोक किन, डॉ.महेंद्र सुरवाडे, कृष्णा सावळे सर्व शक्ती सेना विद्यार्थी संघटना जळगाव जिल्हा अध्यक्ष, विनोद सपकाळे, सोनु सूर्यवंशी, विनोद ठाकरे, सचिन सुरवाडे, अभिजीत तायडे, युवराज कोळी, प्रज्ञारत्न मोरे, वैष्णवी मोरे , प्रियंका तायडे, अशोक सांगवीकर, शिकदर तडवी,आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा सावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन सुरवाडे यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!