शेतकऱ्यांच्या ३५ लाख रूपयांची फसवणूक करणार्‍या व्यापार्‍यांवर जळगांव येथे गुन्हा दाखल

अनामित
जळगाव वार्ताहर (प्रमोद कोंडे) केळी उत्पादकांची,  शेतकऱ्यांची  तब्बल ३५ लाख २४ हजार ७२४ रूपयांची फसवणूक करणार्‍या दोघा व्यापार्‍यांवर काल बुधवारी जळगांव तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[ads id='ads1]
 सविस्तर घटना अशी जळगांव तालुक्यातील शेतकर्‍यांची केळी खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांनी  फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुधीर मधुकर चौधरी (रा. पिलखेडा,ता. जळगाव), प्रमोद हरी पवार (रा.नंदगाव), योगराज नामदेव सपकाळे (रा. फुफनी), विजय रामकृष्ण सपकाळे (रा. फुफनी), रतिलाल माणिक पवार (रा. भोकर), रत्नाकर शिवलाल सोनवणे (रा. देवगाव), अनिल बाबुराव चौधरी (रा. पिलखेडा), मोहनचंद नारायण सोनवणे (रा. करंज), संजय रावण पाटील (रा. भोकर), मोहन एकनाथ सोनवणे (रा. फुफनी), शिवाजी पुरमल पाटील (रा. नंदगाव), मच्छिंद्र झावरू कोळी (रा. धानोरा), झेंडू महारू कोळी (रा. धार्डी), किशोर देवाजी सोनवणे (रा. गाढोदा), शिवदास भगवान चौधरी (रा. पिलखेडा) या १५ शेतकर्‍यांची ३५ लाख २४ हजार ७२४ रूपयांची फसवणूक झाली आहे. 

अशोक रघुनाथ पाटील (रा. निंभोरा बु , ता. रावेर) आणि महेंद्र सिताराम निकम (रा. जारगाव, ता. पाचोरा) असे फसवणूक करणार्‍या व्यापार्‍यांची नावे आहेत. ते गेल्या अनेक महिन्यांपासून पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत होते.

दरम्यान, वारंवार मागूनही पैसे मिळत नसल्याने सुधीर चौधरी यांनी १४ शेतकर्‍यांना सोबत घेवून जळगांव तालुका पोलीस स्टेशन मध्ये दोन्ही व्यापार्‍यां विरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!