मुक्ताईनगर (वार्ताहर) काँग्रेसच्यावतीने तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल वाडीले ,अंतुर्ली शहर काँग्रेसचे शे.भैय्या शेख करीम, नामदेव भोई व कार्यकर्त्यांनी रावेर आगारप्रमुख जंजाळ साहेब यांना निवेदन दिले. निवेदनाची दखल घेऊन आज सकाळी नऊ वाजता अंतूर्लीं येथे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री एस. ए. भोई यांनी बसचे पूजा करून तसेच सरपंच सुलभा शीरतुरे यांनी बस ड्रायव्हर एम.बी.शेख तसेच भोई सर यांनी कॅण्डक्टर संजू महाजन यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. रावेर येथे दवाखाने शेतीपयोगी साहित्य सरकारी कामांसाठी तसेच शाळा कॉलेज व इतर कामांसाठी विद्यार्थी, शेतकरी, कामगार , नागरिक महिला यांची सोय झाले मुळे प्रवासी व नागरिक महिला यांनी आनंद व्यक्त केला.
[ads id='ads2]
याप्रसंगी पोलीस पाटील किशोर मेढे, सरपंच सौ सुलभा शिरतुरे , दिनेश पाटील , शेख शे.करीम ,नामदेव भोई , व्ही. आर .महाजन, भागवत महाजन ,सुनील सुरवाडे ,मोहन बारी माजी सरपंच कैलास दुत्ते,अशोक सपकाळ (केळी ग्रुप संचालक) एकनाथ तोरे,सुखदेव ड्रायव्हर ,ग्रामपंचायत सदस्य मोहन बेलदार, शंकर नामदेव पाटील,भास्कर धनगर ,विकास पाटील पातोंडी (माजी सरपंच) ,पांडू धनगर, भास्कर शेलार, चंद्रकांत तायडे, राजू लोहार ,प्रभाकर सोनार काशिनाथ बुवा ,मधुकर वानखेडे ,वसंता पंढरी पाटील,शे.बाबू हुसेन ,फकीरा दवंगे प्रकाश कोळी शेख गुलमु, नटराज टेलर, नाना पाटील ,रमेश महाजन , राजू शिरतुरे,वामनभोई भागवत हरगडे हौसिलाल भोई, सुभाष वंजारी ,व परिसरातील नरवेल ,धामंदे ,पातोंडी, भोकरी ,बेलसवाडी येथील प्रवासी, नागरिक ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिवहन विभाग जळगाव चे जिल्हा व्यवस्थापक , व रावेर आगार प्रमुख श्री बेंडकुळें , जंजाळ यांचे प्रवाशी व गावकऱ्यांचे वतीने अनिल वाडीले यांनी बस सेवा सुरू केल्या बद्दल आभार मानले.