निंभोरा वार्ताहर (प्रमोद कोंडे) विवरा ता.रावेर येथील सरस्वती इंग्लिश स्कूल मध्ये सर्व शक्ती सेनेचा दि. 9 जुलै 2021 सोमवार रोजी सर्व शक्ती सेना मेळाव्याचे छोटे खानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. संजय मोरे सर्व शक्ती सेना ,महाराष्ट्र राज्य ,अध्यक्ष तथा, राष्ट्रीय मानव अधिकार, महाराष्ट्र राज्य, उपाध्यक्ष हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विजय तायडे ,सर्व शक्ती सेना जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष, कृष्णा सावळे, सर्व शक्ती सेना, विद्यार्थी संघटना, जळगाव जिल्हा अध्यक्ष, धनराज कोळी, माजी सरपंच सर्व शक्ती सेना, जळगाव जिल्हा, उपाध्यक्ष , गजानन काडेले, सर्व शक्ती सेना ,जळगाव जिल्हा, संपर्क प्रमुख हे होते. प्रथम प्रा. संजय मोरे सर्व शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य ,अध्यक्ष यांचा राजेंद्र पाटील यांनी शाल, श्रीफळ,व बुके देऊन सत्कार केला.
[ads id='ads1]
तर प्रमुख अतिथी यांचा पुषगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.नंतर कृष्णा सावळे ,यांनी सर्व शक्ती सेना, सामाजिक संघटने विषयी माहिती सांगितली.प्रा. संजय मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त ,करतांना सांगितले की, निरज जी सेठी, सर्व शक्ती सेना, यांचा भ्रष्टाचार मुक्त भारत देश करण्याचा संकल्प असुन माझ्या वर महाराष्ट्राची अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली असुन, महाराष्ट्रात सर्व जाती धर्माच्या, लोकांना सोबत घेऊन संपुर्ण, महाराष्ट्रात प्रत्येक गावांगावात तालुक्यात ,जिल्ह्यात सर्व शक्ती सेना , सामाजिक संघठना स्थापन करून केंद्रिय , महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून शेवटच्या घटका पर्यंत , त्याचा लाभ मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे .
राष्ट्रीय सन्मान, भारतीय संस्कृतीचे संरक्षण, सर्वांना न्याय, अन्याया विरुध्द प्रखर बुलंद आवाज, सर्वागीण विकास राष्ट्रीय सन्मान आणि हिताचे रक्षण करणे, हाच सर्व शक्ती सेनाचा मुख्य उद्देश असुन संपुर्ण, महाराष्ट्र सर्व शक्ती सेनामय, करण्याचा संकल्प असल्याचे प्रा. संजय मोरे सर्व शक्ती सेना,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त, करतांना सांगितले.
या कार्यक्रमामध्ये प्रा. संजय मोरे यांच्या हस्ते, उटखेडा येथील, रहिवाशी राजेन्द्र पाटील यांची सर्व शक्ती सेना जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती पत्र देऊन, गौरविण्यात येऊन पुढील, वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.या प्रसंगी कार्यक्रमाला, विजय तायडे सर्व शक्ती सेना, जळगाव जिल्हा, कार्याध्यक्ष गजानन काडेले, कृष्णा सावळे, धनराज कोळी, पियुष पाटील, शुभम पाटील, अशोक सावळे ईत्यादि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन काडेले यांनी केले तर आभार शुभम पाटील यांनी मानले.
