यावल येथील तत्कालीन नायब तहसीलदार तथा विद्यमान उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांच्या मालमत्तेची उघड चौकशी सुरु.

अनामित
माजी तहसीलदार तथा विद्यमान उपजिल्हाधिकारी यांची सुद्धा लवकरच चौकशी सुरू होणार.

यावल वार्ताहर (सुरेश पाटील) यावल तहसील कार्यालयात सन 2004 ते दिनांक 28/5/2008 या कालावधीत परिविक्षाधीन निवासी नायब तहसीलदार म्हणून तसेच औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभाग उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले आप्पासाहेब छगन शिंदे यांची उघड चौकशी सुरू झाली असल्याची खात्रीलायक माहिती जिल्हास्तरावरून समजली
.
            उघड चौकशीकामी माहिती मिळणे बाबत विषयान्वये दिनांक 19 जुलै 2021 चे पत्र प्रत्यक्ष बघितले असता पत्रात नमूद केले आहे की अप्पासाहेब शिंदे उपजिल्हाधिकारी भूसंपादन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद यांचे मालमत्तेची उघड चौकशी इकडील कार्यालयामार्फत सुरू आहे.

             गैरअर्जदार आप्पासाहेब छगन शिंदे उपजिल्हाधिकारी भूसंपादन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद हे दिनांक 18/6/2004 ते दिनांक 28/5/ 2008 या कालावधीत परिविक्षाधीन निवासी नायब तहसीलदार म्हणून जळगाव जिल्ह्यात यावल तहसील कार्यालयात कार्यरत होते.

          अप्पासाहेब शिंदे यांनी त्या वेळेस कार्यालयात सादर केलेले मत्ता दायित्व विवरणपत्र तसेच त्यांचे सेवा कालावधीत मालमत्ता संपादित करताना वरिष्ठांच्या घेतलेल्या परवानगी बाबतच्या सविस्तर नोंदी,कार्यरत असताना घेतलेले शासकीय कर्ज अग्रीम व त्यांची परतफेड याबाबतची माहिती तसेच शिंदे यांना अदा करण्यात आलेले वेतन,भत्ते, मानधन,अग्रीम व वेतन कपातीबाबतची माहिती अँटी करप्शन ब्युरो विभागाचे पोलीस उपअधीक्षक यांनी मागणी केलेली आहे,मागितलेली माहिती संबंधित विभागाकडे गेल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीकड़े अहमदनगर,औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महसूल विभागाचे लक्ष वेधून आहे.

          याचप्रमाणे यावल येथे बारा वर्षापूर्वी कार्यरत असलेले  तहसीलदार आणि यावल येथे तहसीलदार पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग दबावतंत्र वापरून गैरमार्गाने बोगस शेतकरी म्हणून नोंद करून घेणाऱ्या एका विद्यमान उपजिल्हाधिकाऱ्याने सुद्धा भ्रष्टाचार व गैरमार्गाने कोट्यावधीची माया व मालमत्ता जंगम स्थावर प्रॉपर्टी करून घेतल्याची तसेच यावल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातून कलेक्शन करून देणाऱ्याच्या नावाने मुखत्यार पत्र करून दिले असल्याने गैर कृत्याची तक्रार दाखल झाली असल्याने त्या एका विद्यमान उपजिल्हाधिकाऱ्याची लवकरच चौकशी सुरू होणार असून अपसंपदा कायद्यानुसार मोठी कार्यवाही होणार असल्याचे जळगाव जिल्ह्यातील महसूल क्षेत्रात बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!