रावेर (वार्ताहर) महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) प्रश्नपत्रिकेत भूतकाळात वारंवार मोठ्या प्रमाणात चुका झाल्याने परीक्षार्थ्यांतर्फे आरोप केले गेले. बालमानसशास्त्र विषयातील व्याकारणांच्या, प्रश्नांच्या उत्तरांच्या पर्यायांमध्ये अनेक चुका निदर्शनास आल्या होत्या.
[ads id='ads1]
काही प्रश्नांना पर्याय चुकीचे तर काही प्रश्नच चुकीचे होते. तर काही प्रश्न न देता फक्त पर्याय दिलेले असे प्रश्न समाविष्ट होते. विशेषतः उर्दू माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेचा अनुवाद करताना अनेक चुका पूर्वी झाल्या व उर्दू भाषा पेपर 1 मध्ये काही प्रश्नच चुकीचे होते उदाहरण खालील रेखांकित वाक्य ओळखा...? प्रश्नपत्रिकेत प्रश्नामध्ये रेषा नव्हती..
प्रश्नपत्रिकेत असे चुका होत असताना परिक्षेच्या वेळी गोंधळ निर्माण होऊन परीक्षार्थींच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो. म्हणून प्रश्नपत्रिका तयार करत असताना विषयतज्ञ व अनुभवी व्यक्तीकडूनच प्रश्न पत्रिका तयार करण्याचे काळजीपूर्वक काम केले पाहिजे,
व पेपर 1 व 2 ची काठिण्य पातळी कमी करावी विशेष म्हणजे उर्दू माध्यमाच्या पेपर सेट करत असताना डीटीपी व अनुवादात विशेष काळजी घेण्याची गरज आहे त्याकरिता एकापेक्षा जास्त पेपर सेटर कडून त्याची पुरूफ रेडींग केल्यास चुका कमी होण्याची शक्यता होऊ शकते.करिता ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन (आयटा) महाराष्ट्र, चे प्रदेशाध्यक्ष मा.सय्यद शरीफ यांच्या सूचनेनुसार .माननीय तुकाराम सुपे आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, व माननीय शिक्षण मंत्री, वर्षा गायकवाड याना एका निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे.या निवेदनात आयटा महाराष्ट्र ईशु समितीचे सचिव पठाण शरीफ खान याची स्वाक्षरी आहे.