रावेर तहसीलदार यांना तत्काळ निलंबित करा अन्यथा रावेर तालुका वंचित बहुजन आघाडी १५ ऑगस्ट रोजी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार
रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) वंचित बहुजन आघाडी रावेर तालुक्याच्या वतीने आज दि.११/०८/२०२१ बुधवार रोजी दुपारी १ वाजता उप विभागीय अधिकारी फैजपूर भाग फैजपूर कैलास कडलक प्रांत अधिकारी व पोलीस उपविभागीय अधिकारी यांना रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या मनमानी कारभारा बाबत चे निवेदन देण्यात आले दि.०९/०८/२०२१ रोजी दुपारी ४:३० वाजता वंचित बहुजन आघाडीचे ७ पदाधिकारी रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना महाराष्ट्रात ज्या जिल्ह्या मध्ये अति वृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यांचे शेती पिके वाहून गेल्यामुळे
[ads id='ads1]
व संपूर्ण घरांची पडझड झाल्या मुळे त्या जिल्ह्या मध्ये शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने अजून पर्यंत मदत मिळाली नसून व सर्व सामान्य माणसाना सुद्धा घर बांधण्यासाठी कोणत्यास प्रकारची मदत मिळाली नाही व रावेर, यावल तालुक्यात जून जुलै मध्ये वादळामुळे कापणीवर आलेल्या केळी पिकाचे शेतकर्याचे संपूर्ण नुकसान झालेले असून आता पर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्याला महाराष्ट्र शासनाने कोणतीच मदत केलेली नाही अश्या मागण्यांचे शेतकऱ्याच्या हिताचे निवेदन देण्यासाठी गेले असता रावेर तहसिलदार यांनी निवेदन स्वीकारण्यास मनाई केली त्यांना जाब विचारला की, तुम्ही आमच्या पक्षाचे निवेदन का घेत नाही. व असा भेदभाव तुम्ही का करीत आहे. तेव्हा तहसीलदार मॅडम जोरात बोलून म्हणाल्या कि मी फक्त ५ लोक असतील तेव्हाच तुमचे निवेदन घेईल अन्यथा निवेदन घेणार नाही. असे म्हणून कॅबीनच्या बाहेर निघून जा.
तेव्हा आम्ही रावेर तहसिलदार यांना विचारणा केली कि याच्या आधी इतर पक्षाचे निवेदन तुम्ही करोना काळात सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळता सर्व नियम धाब्यावर ठेवुन तुम्ही इतर पक्षाचे निवेदन १५ ते २० लोक असल्यावर घेतले आहे व आमच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाचे निवेदन घेताना ५ लोकांची अट का ? असा प्रश्न विचारला असता उर्मीट पणे व जोर जोरात बोलून आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याचा अपमान होईल असे जोर जोरात बोलून वक्तव्य केले अश्या या बेजबाबदार वर्तणूक करणाऱ्या तहसिलदार ह््या जोरात बोलू लागले कि हा माझा मनाचा प्रश्न आहे इथले अधिकारी मी आहे कि तुम्ही आहे.
तुम्ही मला कायदा शिकवू नका अशा अपमानास्पद भाषेमध्ये कर्तव्यावर असलेले पोलीस यांना म्हणाल्या कि मी तुम्हाला आधीच सांगितले होते कि अश्या भांडणखोर लोकांना निवेदन देण्यासाठी का आणले अशा अपमानास्पद भाषेत त्यांच्या बोलण्यावरून असे सिद्ध होत आहे. तहसिलदार मॅडम जातीवादी असून आम्हा वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अपमान करता अशा बेजबाबदार व जातीवादी रावेर येथील तहसिलदार उषाराणी देवगुणे यांना निलंबीत करण्यात यावे. अन्यथा रावेर तालुका वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल होणा-या परिणामास तहसिलदार व शासन जबादार राहील याची शासनाने नोंद घ्यावी अश्या प्रकारचे निवेदन Faijpur प्रांताधिकारी कैलास कडलक पोलीस विभागीय अधिकारी फैजपूर यांना व रावेर पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना देण्यात आले.
निवेदन देतांना उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सरचिटनीस दिनेश इखारे, रावेर वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, जिल्हा कामगार नेते बालाजी पठाडे, यावल तालुका अध्यक्ष मनोज कापडे, रावेर तालुका उपाध्यक्ष सलीम शाह, रावेर तालुका उपाध्यक्ष विनोद तायडे, रावेर तालुका सचिव राजेंद्र अवसरमल, रावेर तालुका सचिव अर्जुन वाघ, रावेर शहर उपाध्यक्ष इम्रान शेख, रावेर शहर सचिव दौलत अढांगळे, फैजपूर शहर सचिव सोनु वाघूळदे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.