14 वर्षीय दीक्षा शिंदेची नासाच्या व्हर्च्युअल पॅनलसाठी निवड; वंचितने केले कौतुक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 औरंगाबाद (सुवर्णदिप वृत्तसेवा) येथील 14 वर्षीय आंबेडकरी विचाराची दहावीत शिकत असलेल्या  दीक्षा शिंदेने नासाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या  पॅनलमध्ये स्थान मिळवले.  दीक्षाची नासाच्या एमएसआय फेलोशिप पॅनलसाठी निवड झाली आहे.

  दीक्षाने ब्लॅक होल आणि देव अस्तित्वात नसल्याच्या विषयावर सिध्दांत लिहीला, व तीन प्रयत्ना नंतर नासाने तो स्विकारला आहे. तसेच तीला त्यांच्या वेबसाईट साठी लेख लिहण्यास सांगितले आहे.

  वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेश नेते अमित भुईगळ, व संदिप शिरसाठ शहर अध्यक्ष औरंगाबाद (प) यांनी दीक्षाची भेट घेवून तिचे अभिनंदन केले. तसेच दीक्षाच्या पालकांची भेट घेवून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दीक्षाला पुढील ऊच्च शिक्षणासाठी  शुभेच्छा देवून पाठीशी असल्याचे आश्वस्त केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!