रावेर वार्ताहर (प्रमोद कोंडे) रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द येथे "मीच नोंदवणार माझा पिकपेरा" व बांधावरूनच शेतकरी करणार आता पीक पाहणी, या शासनाच्या योजनेनुसार नुकतेच खिर्डी खु. येथे इ पिक पाहणी प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील 30 जुलै 2021 च्या शासन निर्णयानुसार या महसुल वर्ष सन- 2021/ 2022 पासून आता इ पीक पाहणीला सुरुवात झाली आहे.
[ads id='ads1]
जळगाव जिल्हासाठी इ पीक पाहणी मोबाईल अॅप मधून पीक पाहणी भरण्यासाठी 15 ऑगस्ट पासून उपलब्ध झाली आहे .शेतकरी खातेदारांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी खिर्डी खु. येथे मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी भरणे व ते अॅप डाउनलोड करून घेण्याचे प्रशिक्षण गावातील उत्साही शेतकरी खातेदारांना देण्यात आले .यासाठी शेतकरी खातेदारांना प्रत्यक्ष अॅप चे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी शेतकरी खातेदारांनी स्वतः पीक पाहणी अॅपवर भरून घेतली. त्यानंतर 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर पर्यन्त सर्व शेतकरी खातेदारांनी आपला पिकपेरा अॅपच्या सहाय्याने भरून आपली पीकपाहणी अद्यावत करावी. असे आवाहन करण्यात आले.
सदर कार्यक्रम रावेर तहसिलदार उषाराणी देवगुणे यांच्या आदेशाने घेण्यात आला .यावेळी खिर्डी तलाठी खान, कोतवाल अनंता कोळी व शेतकरी प्रभाकर महाजन ,सुरेश पाटील ,किशोर पाटील , पोपट चौधरी ,तुळशीराम कोळी ,सुभाष महाजन व ग्रामस्थ उपस्थित होते.