रावेर येथील क्रिडाशिक्षक ई.जे. महाजन सर यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) हाॕकी असोसिएशन जळगांव  व गोदावरी फाऊंडेशन यांचे वतीने गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय जळगांव, येथे रावेर शिक्षण संवर्धक संघ, रावेर संचलीत सरदार जी जी हायस्कूलचे पर्यवेक्षक आणि क्रिडाशिक्षक श्री ई जे महाजनसर यांना आज दि. २९ ऑगस्ट रविवार रोजी हाॕकीचे जादुगार मेजर श्री ध्यानचंद यांचे जयंती दिनी आयोजीत क्रिडा दिन  रोजी जिल्हा क्रिडा पुरस्कार  *गुणवंत  क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार* देऊन गौरविण्यात आले.

       संस्थेचे अध्यक्ष श्री कन्हैयासेठ अग्रवाल, उपाध्यक्ष श्री अशोकशेठ वाणी, चेअरमन श्री प्रकाशजी मुजुमदारसर, सचिव श्री प्रमोद वाणी, सर्व  संचालक मंडळ , संस्थेचे सहसचीव तथा सौ के एस ए गर्ल्स हायस्कूल रावेरचे प्रभारी मुख्याध्यापक श्री जयंत कुळकर्णीसर, सरदार जी जी हायस्कूल रावेरचे मुख्याध्यापक श्री शिरीष वाणीसर , दोन्ही शाळांचे सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारीवृंद  यांनी श्री  ई जे महाजनसर यांचे अभिनंदन केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!